‘निगेटिव्ह’ ग्रुपच्या रक्ताचा तुटवडा

By admin | Published: May 2, 2017 01:36 AM2017-05-02T01:36:34+5:302017-05-02T01:36:34+5:30

गेल्या दोन वर्षांत निवडणुकांना समोर ठेवून उन्हाळ्यातही रक्तदान शिबिरे घेण्यात आल्याने रक्तपेढ्यांना रक्ताची विशेष चणचण जाणवली नाही.

'Negative' group blood scarcity | ‘निगेटिव्ह’ ग्रुपच्या रक्ताचा तुटवडा

‘निगेटिव्ह’ ग्रुपच्या रक्ताचा तुटवडा

Next

रक्तपेढ्यांमध्येही मिळेना : शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांचे रक्तदानाचे आवाहन
नागपूर : गेल्या दोन वर्षांत निवडणुकांना समोर ठेवून उन्हाळ्यातही रक्तदान शिबिरे घेण्यात आल्याने रक्तपेढ्यांना रक्ताची विशेष चणचण जाणवली नाही. परंतु यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने रुग्णांच्या
नातेवाईकांवर रक्तासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये काही काळ पुरेल एवढाच रक्त पिशव्यांचा साठा आहे. यातही ‘निगेटिव्ह’ रक्तगटाच्या रक्ताचा ठणठणाट असल्याचे समोर आले आहे.
उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी अडीचशेवर खासगी रुग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा येथून रुग्णांचा ओढा नागपूरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वच ठिकाणी जेमतेम रक्ताचा साठा उपलब्ध आहे. काही रक्तपेढ्या ‘निगेटिव्ह’ ग्रुपचा रक्तदाता उपलब्ध करून देण्याच्या अटीवरच या ग्रुपचे रक्त उपलब्ध करून दिले जात आहे. इतर ग्रुपमध्ये ‘एबी’, ‘ओ’ व ‘बी’ पॉझिटिव्ह रक्ताचा साठाही जेमतेम असल्याची माहिती आहे. रक्ताच्या तुटवड्याला घेऊन शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
मागणी हजाराची पुरवठा
२००-३०० रक्त पिशव्यांचा
शहरात दिवसाकाठी साधारण एक हजार रक्त पिशव्यांची मागणी असते. परंतु सध्याच्या दिवसात २००-३०० रक्त पिशव्यांचा पुरवठा होत आहे. रक्त दिलेले सर्वच रुग्ण ‘रिप्लेसमेंट’ रक्त देतील असे नाही. उन्हाळी सुट्या असल्याने अनेक रक्तदातेदेखील बाहेरगावी जातात. या दिवसांत रक्तदान शिबिरे कमी झालेली असतात. उन्हाळ्यात रक्तदान केल्याने शरीराला नुकसान होईल किंवा बाहेर पडल्यावर लगेच चक्कर येईल, अशाप्रकारचे गैरसमज असल्याने रक्तदान करण्यास कचरतात. याचा फटका रक्तपेढ्यांना व रुग्णांना बसत आहे.

Web Title: 'Negative' group blood scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.