किशोरवयीन मुलांशी घरात सकारात्मक संवाद आवश्यक : डॉ. गावंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 09:22 PM2018-01-06T21:22:43+5:302018-01-06T21:24:23+5:30

हार्मोनल बदलांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. त्या बदलांना प्रतिसाद म्हणून किशोरवयीन मुले वाईट गोष्टींकडे आणि व्यसनांकडे आकर्षित होऊ शकतात तसेच लैंगिक आकर्षणातून अनेक चुका करतात. या प्रश्नावर केवळ घरात साधला जाणारा सकारात्मक संवाद हेच उत्तर आहे, असे मत पेडिकॉनचे माध्यम समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले.

Negotiations with teenage children need positive: Dr. Gavande | किशोरवयीन मुलांशी घरात सकारात्मक संवाद आवश्यक : डॉ. गावंडे

किशोरवयीन मुलांशी घरात सकारात्मक संवाद आवश्यक : डॉ. गावंडे

Next
ठळक मुद्देहार्मोनल बदलांमुळे होतात शारीरिक, मानसिक व भावनिक बदल

आॅनलाईन लोकमत
नागपूर : हार्मोनल बदलांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. त्या बदलांना प्रतिसाद म्हणून किशोरवयीन मुले वाईट गोष्टींकडे आणि व्यसनांकडे आकर्षित होऊ शकतात तसेच लैंगिक आकर्षणातून अनेक चुका करतात. या प्रश्नावर केवळ घरात साधला जाणारा सकारात्मक संवाद हेच उत्तर आहे, असे मत पेडिकॉनचे माध्यम समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, घरात सकारात्मक संवाद साधत असताना एकमेकाना ‘स्पेस’ व वरिष्ठांना योग्य आदर मिळायला हवा. हे सगळं किशोरवयीन मुले न्याहाळत असतात. जर घरातील वातावरण सकारात्मक असेल तर हॉर्मोनल बदलांमुळे होणाऱ्या समस्यांवर मात करता येते. मुलींविषयी अधिक माहिती देताना डॉ. गावंडे म्हणाले, १२ ते १४ या वयोगटात मुलींचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होत असतो. त्यामुळे या वयातील मुलींना समजावून सांगणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे गरजेचे असते. या वयोगटातील मुलींमध्ये मासिक पाळी अनियमितता, वजन वाढणे अशा समस्या उद्भवतात. पण, त्यावर योग्य वेळी उपाय करणेही गरजेचे असते.
१०० पैकी ४० बालकांना बालदमा- डॉ. देशमुख
बालदम्यासंबंधी इनहेलरपेक्षा तोंडाद्वारे घेण्याच्या गोळ्या जास्त प्रभावी आहे; असा पालकांमध्ये गैरसमज आहे. मात्र, अनेक वर्षाची संशोधने व वैद्यकीय अभिप्रायांनी हे सिद्ध झाले आहे की, मुखाद्वारे घेण्याच्या औषधांपेक्षा इनहेलर अर्थात श्वासाद्वारे घेण्याची औषधे अधिक सुरिक्षत, प्रभावी आणि सोपी असतात, अशी माहिती डॉ. संजय देशमुख यांनी दिली. डॉ. देशमुख म्हणाले की, वाफेद्वारे, प्रेशरपंपद्वारे आणि पार्टिकल कॅप्सुल अशी तीन प्रकारची इनहेलर असतात. त्यापैकी कुठल्याही इनहेलरचे दुष्परिणाम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदूषणामुळे बालदम्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगत त्यांनी १०० पैकी ४० बालकांना बालदमा असल्याची माहिती दिली. मात्र, बालदमा शंभर टक्के बरा होतो, असा विश्वास दाखवत डॉक्टर देशमुखांनी प्रदूषण आणि अ‍ॅलर्जीपासून बालकांचे रक्षण करण्याचा सल्ला दिला.

Web Title: Negotiations with teenage children need positive: Dr. Gavande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.