आयटी पार्क फुटपाथवर अतिक्रमणांचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:16+5:302021-03-15T04:09:16+5:30
नागपूर : आयटी पार्कजवळील फुटपाथवर मोडिफाइड वाहनांवर चायनीज फूड व पराठे विकले जातात. संध्याकाळच्या सुमारास येथे ग्राहकांची गर्दी उसळलेली ...
नागपूर : आयटी पार्कजवळील फुटपाथवर मोडिफाइड वाहनांवर चायनीज फूड व पराठे विकले जातात. संध्याकाळच्या सुमारास येथे ग्राहकांची गर्दी उसळलेली असते. या वाहनांनी फुटपाथवर जाळे विणले आहे. कारवाई होत नसल्याने फुटपाथ नागरिकांसाठी कधीच मोकळे नसतात.
-------------
कचऱ्यामध्ये गुराढोरांचा राबता ()
नागपूर : बिजलीनगर येथील रस्त्यालाच नागरिकांनी कचरा घर बनविले आहे. या भागात रोज कचरा उचलणारी गाडी येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळेच, घरातील कचरा रस्त्यावरच फेकत असतात. या कचऱ्यामध्ये खाद्यान्नासाठी गुरेढोरे ठाण मांडून असतात. यामुळे वाहनचालकांना समस्या होते. गुरेढोरे रस्त्यावरच फिरत असतात.
------
माटे चौकातील सिग्नल तुटला ()
नागपूर : माटे चौकातील सिग्नल बऱ्याच दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे; परंतु प्रशासनाचे सिग्नल दुरुस्ती केलेली नाही. येथेच फुटपाथवरील पेव्हर ब्लॉकही निघालेले आहेत. मात्र, तेही दुरुस्त केलेले नाही. यामुळे, वाहन चालकांना जाण्यास त्रास होतो.
-----------
मोठ्या दगडांनी गटार झाकले ()
नागपूर : हिस्लॉप कॉलेजजवळ गटार उघले पडले आहे. मोठ्या दगडांनी हे गटार झाकण्यात आले आहे. शहरात अशी स्थिती सर्वत्र दिसून येते. यामुळे, अपघाताची शक्यता असते. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.
.........