कल्याण ज्वेलर्सची नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:08 AM2021-03-31T04:08:14+5:302021-03-31T04:08:14+5:30

नागपूर : भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी कंपन्यांपैकी एक कल्याण ज्वेलर्सची पहिल्या तिमाहीत आपल्या रिटेल उपस्थितीमध्ये १३ टक्क्यांनी वाढ करण्याची ...

Network of Kalyan Jewelers | कल्याण ज्वेलर्सची नेटवर्क

कल्याण ज्वेलर्सची नेटवर्क

Next

नागपूर : भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी कंपन्यांपैकी एक कल्याण ज्वेलर्सची पहिल्या तिमाहीत आपल्या रिटेल उपस्थितीमध्ये १३ टक्क्यांनी वाढ करण्याची योजना आहे. २४ एप्रिल या एकाच दिवशी देशभरातील सात राज्यांमध्ये १४ नवीन शोरूम्स सुरू करणार आहे. प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये एकूण पाच नवी आऊटलेट सुरू केले जातील, यामध्ये एक फ्लॅगशिप शोरूमदेखील असेल. कंपनी चेन्नईत नॉर्थ उस्मान रोड येथे आणखी एक फ्लॅगशिप स्टोर सुरू करणार आहे. याशिवाय दिल्लीतील द्वारका, मुंबईतील माटुंगा व लोअर परेल फिनिक्स पॅलॅडियम आणि हैदराबादमधील दिलसुखनगर येथे प्रत्येकी एक शोरूम सुरू केले जाणार आहे. कल्याण ज्वेलर्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक टी एस कल्याणरामन म्हणाले, पहिल्या तिमाहीत आम्ही एकूण १४ नवी आऊटलेट सुरू करू. त्यामुळे आमची रिटेल उपस्थिती १३ टक्क्यांनी वाढेल. देशभरातील २१ राज्यांमध्ये कल्याण ज्वेलर्सच्या शोरूम्स आहेत. (वा.प्र.)

Web Title: Network of Kalyan Jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.