तिसरी लाट थोपविण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्पांचे जाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 12:40 AM2021-05-04T00:40:14+5:302021-05-04T00:40:23+5:30

या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनसंदर्भात प्रशासन पातळीवर काय तयारी सुरू आहे, याचा हा आढावा... 

A network of oxygen projects to block the third wave | तिसरी लाट थोपविण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्पांचे जाळे

तिसरी लाट थोपविण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्पांचे जाळे

Next

बेड, रेमडेसिविर आणि ऑक्सिजन या तीन गोष्टींनी शेकडो कोरोना रुग्णांचे जीव घेतले आणि नातेवाइकांचे जीव मेटाकुटीला आणले. विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली दिसली. ही दुसरी लाट अजून मानगूट सोडायला तयार नसताना येत्या जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येत असल्याचा इशारा सरकारने देऊन ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनसंदर्भात प्रशासन पातळीवर काय तयारी सुरू आहे, याचा हा आढावा... 

१. अकोला
सध्या गरज : महिन्याला ६०० टन. प्रतिदिन २० टन.
प्रस्तावित उपाय : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हवेतून ऑक्सिनजनिर्मिती प्लांट प्रस्तावित. शहरात दोन लिक्विड ऑक्सिजन टँक उभारणार.  तेल्हारा येथेही टँक उभारणार. पारस औष्णिक वीज केंद्रातून ऑक्सिजननिर्मिती.
२. गडचिरोली
सध्या गरज : दररोज १० मे. टन. गरजेनुसार उपलब्ध होत आहे.
प्रस्तावित उपाय : हवेतून १० ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांचा प्रस्ताव. ६ प्रकल्पांना मंजुरी.

३. बुलडाणा
सध्या गरज : प्रतिदिन १२.७३ 
मेट्रिक टन.
प्रस्तावित उपाय : हवेतून ऑक्सिजननिर्मितीचे उपविभागीय 
स्तरावर ५ प्रकल्प. मे अखेरपर्यंत कार्यान्वित करणार. दोन प्रकल्प येत्या आठवड्यात सुरू होत आहेत. अन्य तीन प्रकल्पांना १५ दिवस ते १ महिना लागेल.
४. भंडारा
सध्या गरज : दररोज ११५० जम्बो व मध्यम आकाराच्या ३५० सिलिंडर्सची आवश्यकता.
प्रस्तावित उपाय : जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँक. साकोली, लाखनी, लाखांदूर, तुमसर व पवनी या पाच ठिकाणी ॲाक्सिजन काॅन्सन्ट्रेटर प्रकल्प.

५. गोंदिया
सध्या गरज : दररोज साडेपाच मेट्रिक टन. 
प्रस्तावित उपाय : मेडिकल कॉलेजच्या आवारात १३ केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक तयार.
६. वर्धा
सध्या गरज : दररोज किमान तीन मेट्रिक टन. 
प्रस्तावित उपाय : जिल्ह्यातील अकरा शासकीय रुग्णालयात वायू ऑक्सिजन प्लांट लावणार. 

७. नागपूर
सध्या गरज : दररोज १६० मेट्रिक टन. 
प्रस्तावित उपाय : शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची उभारणी व नवीन सिलिंडर्स खरेदी करणार. कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रांतून दररोज किमान १ हजार ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करणार.

८. अमरावती
सध्या गरज : रोज १८ ते २० मेट्रिक टन. 
प्रस्तावित उपाय : २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी करणार. जिल्हा रुग्णालय, पीडीएमएमसी, अचलपूर व धारणी येथील उपजिल्हा रुग्णालय व नांदगाव खंडेश्वर येथील ट्रामा केअर युनिट येथे पीएसए ऑक्सिजन जनरेटर प्लांट्सची उभारणी. 
९. वाशिम
सध्या गरज : दररोज ११ मे.टन. 
प्रस्तावित उपाय : जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आणखी दोन आणि कारंजा येथे एक, असे तीन प्रकल्प उभारणार.
१०. चंद्रपूर
सध्या गरज : दररोज ४० मेट्रिक टन. 
प्रस्तावित उपाय : राजुरा, वरोरा, चिमूर, मूल, ब्रह्मपुरी येथील प्रकल्प दोन आठवड्यांत कार्यान्वित होणार. ३४४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदीसाठी निविदा काढल्या.
११. यवतमाळ
सध्या गरज : दररोज १८ मेट्रिक टन. 
प्रस्तावित उपाय : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट तयार करणार. तालुकास्तरावर लिक्विड ऑक्सिजनचे १० प्लांट तयार करणार.

एअर टू लिक्विड प्रकल्प : मोठ्या क्षमतेचा. खर्च २५० कोटी. उभारणीसाठी दीड ते दोन वर्षे. दररोज क्षमता १०० मे. टन. 

एअर टू लिक्विड सिलिंडर रिफिलिंग प्रकल्प : कमी क्षमतेचा. रोज ५०० ते २ हजार जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता. खर्च किमान ४ कोटी ते कमाल ९ कोटी.

लिक्विड ऑक्सिजन टू सिलिंडर रिफिलिंग प्रकल्प : कमी क्षमतेचा. टँकरने ऑक्सिजन आणून सिलिंडरमध्ये भरणा. स्टोअरेज टँक व पम्पिंग सिस्टीम उभारावी लागते. खर्च किमान दोन कोटी ते कमाल चार कोटी.

या लागतात परवानग्या... 
राज्य शासनाचा स्फोटके विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, औद्योगिक विभाग, वीज विभाग, महापालिकेचा अग्निशमन विभाग.

 

Web Title: A network of oxygen projects to block the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.