पॉवर प्लांटच्या राखेपासून बनतोय खापरीचा नवीन पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:32 PM2019-04-20T22:32:39+5:302019-04-20T22:35:04+5:30
नागपूर व चंद्रपुरात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहे. यातून मोठ्या संख्येने राख म्हणजेच फ्लाय अॅश निघते. या राखेचे नियोजन करणे अवघड आहे. प्रकल्पाच्या परिसरात फ्लाय अॅश ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अशावेळी शासनस्तरावर फ्लाय अॅशचे नियोजन करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. फ्लाय अॅशचा औद्योगिक तसेच रस्ते व पुलाच्या निर्मितीतही उपयोग होत आहे. वर्धा रोडवरील खापरी येथे निर्माण होत असलेल्या चार पदरी पुलासाठी मोठ्या प्रमाणात फ्लाय अॅशचा उपयोग करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर व चंद्रपुरात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहे. यातून मोठ्या संख्येने राख म्हणजेच फ्लाय अॅश निघते. या राखेचे नियोजन करणे अवघड आहे. प्रकल्पाच्या परिसरात फ्लाय अॅश ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अशावेळी शासनस्तरावर फ्लाय अॅशचे नियोजन करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. फ्लाय अॅशचा औद्योगिक तसेच रस्ते व पुलाच्या निर्मितीतही उपयोग होत आहे. वर्धा रोडवरील खापरी येथे निर्माण होत असलेल्या चार पदरी पुलासाठी मोठ्या प्रमाणात फ्लाय अॅशचा उपयोग करण्यात आला आहे.
खापरी रेल्वे फ्लायओव्हरच्या दोन्ही मार्गासाठी फ्लाय अॅश मागविण्यात आली आहे. फ्लायओव्हरच्या कन्स्ट्रक्शन साईडच्या रिटेनिंग वॉलच्या मधात फ्लाय अॅश टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथे राखेच्या टेकड्या दिसून येत आहेत. फ्लाय अॅशमध्ये सिमेंटिंग मटेरियल मिळवून रस्त्याच्या निर्मितीत वापर केला जात आहे. रस्तेनिर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेत फ्लाय अॅशचा वापर होत आहे.
केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, फ्लाय अॅशच्या उपयोगामुळे बोल्डर, दगड, मातीची आवश्यकता राहिलेली नाही. विद्युतनिर्मिती प्रकल्पातून नि:शुल्क फ्लाय अॅश मिळत असल्याने पुलाच्या निर्मितीचा खर्चही कमी येत आहे
थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची रेल्वेने ठेवली अट
एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खापरीच्या नव्या पुलाचे निर्माणकार्य ५० टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वे पोर्शनमध्ये निर्माण कार्यासाठी मध्य रेल्वेला तीन महिन्यापूर्वी पूर्व ब्लॉक मागितला होता. परंतु आतापर्यंत ब्लॉक मिळालेला नाही. उलट रेल्वेकडून थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एनएचएआय थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून त्याचा अहवाल रेल्वेला देईल. अहवालाच्या आधारावर रेल्वेद्वारे ब्लॉक दिल्यानंतर पुलाचे निर्माणकार्य येणाऱ्या जुलै-ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.