नव्या कोरोना विषाणूचा तूर्तास धोका टळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:49 AM2021-01-05T00:49:48+5:302021-01-05T00:51:45+5:30

New Corona virus , nagpur news ‘यूके’वरून नागपुरात परतलेल्या व नव्या विषाणूचा चाचणीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविलेल्या तीन रुग्णाच्या नमुन्यांचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आल्याने नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला.

New Corona virus threat averted immediately! | नव्या कोरोना विषाणूचा तूर्तास धोका टळला!

नव्या कोरोना विषाणूचा तूर्तास धोका टळला!

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्याचा प्रयोगशाळेत तिघांचा अहवाल निगेटिव्ह : पाच रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

 लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : ‘यूके’वरून नागपुरात परतलेल्या व नव्या विषाणूचा चाचणीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविलेल्या तीन रुग्णाच्या नमुन्यांचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आल्याने नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला. तूर्तास नव्या कोरोना विषाणूचा धोका टळल्याचे बोलले जात आहे. मेडिकलच्या विशेष वॉर्डात आणखी पाच रुग्ण उपचाराखाली असून, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतलेल्या आठ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. हे रुग्ण पुणे, मुंबई व ठाण्यातील आहेत. कोरोना विषाणूचे नवे रूप जास्त धोकादायक आणि संक्रामक असल्यामुळे इंग्लंड, युरोपियन युनियन, मिडल ईस्ट व साऊथ आफ्रिका येथून नागपुरात परतणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून पॉझिटिव्ह आलेल्यांना मेडिकलच्या विशेष वॉर्डात तर निगेटिव्ह आलेल्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवले जात आहे.

२२ डिसेंबर रोजी ‘यूके’हून नागपुरात परतलेला नंदनवन येथील २८ वर्षीय रुग्णाचा अहवाल मेडिकलबाहेर पॉझिटिव्ह आला. यामुळे रुग्णाला मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यात आले होते. त्यानंतर नरेंद्रनगर येथील ३६ वर्षीय तर वर्धमाननगर येथील ३२ वर्षीय प्रवासी यूकेवरून नागपुरात परतला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. या सर्वांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आज या तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे मेडिकल प्रशासनाने तूर्तास तरी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या तिघांना रात्री उशिरा मेडिकलमधून सुटी देण्यात आली. सध्या विशेष वॉर्डात पाच रुग्ण आहेत. यातील तिघांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, उर्वरित दोन रुग्णांचे नमुने उद्या मंगळवारी पुण्याचा प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.

तिघांना रुग्णालयातून सुटी

‘यूके’हून नागपुरात परतलेल्या तीन रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत निगेटिव्ह आला. यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरित तिघांचे अहवाल पुढील दोन दिवसात येण्याची शक्यता आहे तर, दोघांचे नमुने मंगळवारी ‘एनआयव्ही’कडे पाठविले जातील.

डॉ. अविनाश गावंडे

वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

Web Title: New Corona virus threat averted immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.