न्यू क्राफ्ट सिल्क इंडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:40+5:302021-01-10T04:07:40+5:30
नागपूर : विविध राज्यांतील कॉटन व सिल्कच्या प्रसिद्ध आणि आकर्षक डिझाईनचा समावेश असलेले तब्बल ४९ स्टॉल असणारे प्रदर्शन व ...
नागपूर : विविध राज्यांतील कॉटन व सिल्कच्या प्रसिद्ध आणि आकर्षक डिझाईनचा समावेश असलेले तब्बल ४९ स्टॉल असणारे प्रदर्शन व विक्री हिस्लॉप कॉलेजजवळील चिटणवीस सेंटरमध्ये १ जानेवारीपासून सुरू असून सर्व स्टॉलवर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे. हे प्रदर्शन ११ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले राहील. प्रदर्शनात हॅण्डलूमवर उत्कृष्ट कलाकुसर करणाऱ्या विणकरांद्वारे विणलेल्या कॉटन व विविध राज्यातील सिल्क साड्या, ड्रेस मटेरियल, सूट, स्टोल्स, कुर्ता, कुर्ती, दुपट्टे, फॅशन ज्वेलरी व गृहसजावटीची विविध आकर्षक उत्पादने आहेत. या उत्पादनांपैकी काहीवर सवलत देण्यात येत आहे. इतर उत्पादनांची थेट कारागिरांकडून विक्री होत असल्याने बाजारभावापेक्षा कमी किमतीत उत्कृष्ट दर्जा व अस्सल उत्पादने उपलब्ध आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्रप्रदेश येथील नामांकित उत्पादने प्रदर्शनात आहेत. हे प्रदर्शन परंपरागत हॅण्डलूमची कलाकुसर व आधुनिक जीवनशैलीची सांगड घालणारे आहे. सणासुदीत नवीन पेहरावाची खरेदी स्वस्तात आणि आकर्षक वस्तूंनी गृहसजावट बदलता येईल. प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आयोजकांनी म्हटले आहे. प्रवेश नि:शुल्क व पार्किंगची व्यवस्था आहे. (वा.प्र.)