राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा नवी तारीख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:12 AM2021-08-14T04:12:43+5:302021-08-14T04:12:43+5:30

आणखी किती दिवस लांबणार - कारणच गुलदस्त्यात, उत्सुकता टोकाला नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - जेथे करायची ...

New date again for senior police officers in the state | राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा नवी तारीख

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा नवी तारीख

Next

आणखी किती दिवस लांबणार

- कारणच गुलदस्त्यात, उत्सुकता टोकाला

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - जेथे करायची करावी, मात्र एकदाची बदलीची यादी सरकारने जाहीर करावी, अशी काहीशी निराशाजनक प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधून उमटली आहे. आज होईल, उद्या होईल, या आशेवर दोन महिन्यापासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आजही निराशा झाली आहे. सरकारने नवी अधिसूचना काढून आता ३१ ऑगस्टची तारीख दिली आहे.

यापूर्वी पोलीस अधीक्षक आणि त्याउपरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बढती-बदल्यांची प्रक्रिया साधारणता जूनच्या प्रारंभीपासून सुरू होत होती. गेल्या वर्षी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या संबंधाने फोन टॅप अनेक लेण-देणची ओरड झाल्याने सरकारची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांच्या बदलीचा विषय कमालीचा वादग्रस्त बनला आहे. तो एवढा वादग्रस्त ठरला की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् पोलीस महासंचालकांमध्ये बैठक आणि वारंवार चर्चा होऊनही त्यावर निर्णय होत नाही. त्यामुळे कोणतेही कारण न सांगता केवळ तारीख पे तारीख दिली जात आहे. आधी राज्य पोलीस दलातील अधीक्षक आणि त्यावरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूननंतर केल्या जाईल, असे सांगण्यात येत होते. नंतर १५ जुलै, त्यानंतर ३० जुलै अन् आता १४ ऑगस्टच्या पूर्वी बदली करण्याचे बाकायदा सूचना काढण्यात आली होती. त्यामुळे बदलीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी नव्या ठिकाणी झेंडावंदन करण्याची तयारीही चालविली होती. मात्र, आज पुन्हा त्यांना सरकारकडून एका निर्णयाद्वारे तारीख मिळाली आहे. सहसचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या या अधिसूचना वजापत्रात आता ३० ऑगस्टपर्यंत बदल्या करण्यास मान्यता देण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.

वारंवार मिळणाऱ्या तारीख यामुळे आधीच अनेकांना निराशा आली आहे. त्यात आज रात्री नव्या तारखेची माहिती कळताच काहीसा रोष अन् काहीशी निराशा अनेकांनी व्यक्त केली. सरकारने पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची जेथे करायची तेथे करावी, मात्र एकदाची बदली जाहीर करावी, असे खासगीत बोलताना म्हटले आहे.

---

अनेक जण सायलेंट मोडवर

बदलीच्या प्रतीक्षेत गेल्या अडीच महिन्यापासून मानसिक तयारी करून असलेल्यांपैकी अनेकांनी नवे काही करण्याऐवजी हातातील काम संपविण्याला प्राधान्य दिले आहे. अनेक अधिकारी सायलेंट मोडवर गेले आहेत. नव्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था तसेच नागरिक आणि पोलिसांच्या हिताची आपली नवीन योजना तेथेच सुरू करू, अशी मानसिकता काही अधिकाऱ्यांनी बनविली आहे.

----

घोडे कुठे अडले?

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक ते अतिरिक्त महासंचालक दर्जाचे ४७ अधिकारी बदली आणि बढतीसाठी पात्र आहेत. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांना बदली आणि पदोन्नती देण्यावर एकमतही झाले आहे. मात्र, असे असताना घोडे कुठे अडले, ते कळायला मार्ग नाही. विशेष असे की, वरिष्ठांची बदली-बढती झाल्यानंतरच एसीपी, पीआय अन् पीएसआयच्या बदल्या होतील. पीएसआय ते एसीपी दर्जाचेही शेकडो अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत दिवस मोजत आहेत.

----

Web Title: New date again for senior police officers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.