लोकसभा निवडणुकीसाठी येणार नवीन ईव्हीएम मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:57 AM2018-07-30T10:57:46+5:302018-07-30T10:59:55+5:30

निवडणुकीत ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत उपस्थित होत असलेले प्रश्न आणि लोकांचा संशय लक्षात घेता भारत निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट असलेल्या मशीनच्या वापरावर भर देणार आहे. यासाठी एम-३ या नवीन आवृत्तीच्या (व्हर्जन) मशीन वापरण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत.

New EVM machine will be used for Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकीसाठी येणार नवीन ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकीसाठी येणार नवीन ईव्हीएम मशीन

Next
ठळक मुद्देव्हीव्हीपॅटची सुविधा असलेले एम-३ मशीनबंगलुरुवरून मागवणार १५ हजार ईव्हीएम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीत ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत उपस्थित होत असलेले प्रश्न आणि लोकांचा संशय लक्षात घेता भारत निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट असलेल्या मशीनच्या वापरावर भर देणार आहे. यासाठी एम-३ या नवीन आवृत्तीच्या (व्हर्जन) मशीन वापरण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातही आगामी लोकसभा निवडणुका घेण्यासाठी नवीन आवृत्तीच्या १५ हजार ईव्हीएम मशीन आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लवकरच निवडणूक आयोगाची एक चमू बंगलुरु येथे जाऊन तथून १५ हजार नवीन ईव्हीएम मशीन नागपुरात आणणार आहे. सध्या ज्या ईव्हीएम मशीन वापरल्या जात आहेत त्या एम-२ आवृत्तीच्या असल्याचे सांगितले जाते. या मशीनमध्ये व्हीव्हीपॅटची सुविधा नाही. त्यामुळे सर्व विभागांना नवीन एम-३ आवृत्तीच्या ईव्हीएम मशीन वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एम-३ आवृत्तीच्या या नवीन मशीनमध्ये एखाद्याने गडबड करण्याचा प्रयत्न कला तर ती ‘फॅक्टरी मोड’मध्ये जाईल. अशा परिस्थितीत ती कंपनीतच ठिक करता येईल. या मशीनमध्ये बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट सुद्धा या मशीनचेच अटॅच करता येईल. दुसऱ्या कुठल्याही आवत्तीच्या मशीनचे बॅलेट पेपर किंवा व्हीव्हीपॅट अटॅच करता येणार नाही. इतकेच नव्हे तर ही मशीन रिमोटने सुद्धा संचालित करता येणार नसल्याचे सांगितले जाते.

जुन्या मशीन बिहारमधील स्थानिक निवडणुकीसाठी वापरणार
नागपूर लोकसभा निवडणूक विभागाकडे सध्या १५ ते १६ हजार एम-२ आवृत्तीच्या ईव्हीएम मशीन आहेत. या मशीन सध्या बिहार येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून आले आहेत. नागपुरातूनही काही मशीन पाठवण्यात येणार आहे.

नवीन ईव्हीएमनेच होणार निवडणूक
आगामी लोकसभा निवडणुका या नवीन ईव्हीएम मशीननेच होतील. व्हीव्हीपॅट आवश्यक झाल्याने निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिले आहेत. एम-३ ही अतिशय लेटेस्ट ईव्हीएम मशीन आहे. १५ हजार मशीन आणले जातील. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच २५ टक्के मशीन या अतिरिक्त मागवल्या जातात. यामध्ये काही मशीन प्रशिक्षणासाठी तर काही मशीन या राखीव ठेवल्या जातात. नवीन मशीन लवकरच आणल्या जातील.
- बी.एस. घुगे
उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नागपूर

Web Title: New EVM machine will be used for Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.