स्मार्ट जिल्हा म्हणून नागपूरची राज्यात नवी ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:15 PM2018-05-02T20:15:34+5:302018-05-02T20:15:50+5:30
शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देताना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार व आरोग्य आदी मूलभूत सुविधा निर्माण करून नागपूर शहर व जिल्हा राज्यात विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून स्मार्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देताना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार व आरोग्य आदी मूलभूत सुविधा निर्माण करून नागपूर शहर व जिल्हा राज्यात विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून स्मार्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
महाराष्ट्र राज्याच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त कस्तूरचंद पार्क येथे मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलीस दलातर्फे परेड कमांडर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विशाल ढोणे यांनी मानवंदना दिली.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत नागपूर शहराची निवड झाली असून १००२ कोटीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, कंट्रोल अॅण्ड कमांड सेंटर, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन असे सहा प्रकल्पही प्रस्तावित आहेत. नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. सर्वांसाठी घरे हे स्वप्न साकारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
बॉक्स..
उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव
यावेळी पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत शहीद जवानांच्या वीर पत्नीस राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आजीवन मोफत प्रवास सवलत योजनेचे स्मार्ट कार्ड अनुराधा एस.देव, प्रीतम हरबंस कौर, स्मिता शशीकांत जुनघरे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार सुनील सीताराम मोवाडे भिवापूर तहसील यांना रोख पाच हजार व प्रशस्तीपत्र देण्यात आले, भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाच्यावतीने मिठी मनोज राठी, गार्गी राहुल कुलकर्णी, निधी विजय भोयर, श्रावणी लक्ष्मीकांत पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णबाण पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.