नागपूरच्या संत्र्याला मिळणार नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 10:39 PM2018-12-06T22:39:48+5:302018-12-06T22:47:41+5:30

नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी लोकमतच्या पुढाकाराने जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन येत्या १८ ते २१ जानेवारीदरम्यान सुरेश भट सभागृहात करण्यात येणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाची माहिती या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

A new identity will be gotten to Nagpur's orange | नागपूरच्या संत्र्याला मिळणार नवी ओळख

नागपूरच्या संत्र्याला मिळणार नवी ओळख

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमतचा पुढाकार : १८ ते २१ जानेवारीदरम्यान जागतिक संत्रा महोत्सवसंत्रा कार्निव्हलसह विविध उपक्रमआंतरराष्ट्रीय स्तरावर संत्र्याचे ब्रॅण्डिंगसंत्रा उत्पादक व उद्योजकांना व्यासपीठ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी लोकमतच्या पुढाकाराने जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन येत्या १८ ते २१ जानेवारीदरम्यान सुरेश भट सभागृहात करण्यात येणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाची माहिती या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
या महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन होत असल्यामुळे याचा लाभ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. या महोत्सवात विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहून तेथील संत्रा उत्पादनासंदर्भातील तंत्रज्ञानाची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून होणार आहे. तसेच देशाच्या विविध भागातील संत्रा उत्पादक संस्था व प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधीसुद्धा या महोत्सवात निमंत्रित करण्यात आले आहेत. संत्र्याचे ब्रॅण्डिंग आणि प्रमोशन करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
लोकमतच्या पुढाकाराने गेल्यावर्षी संत्रा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर यावर्षी सुद्धा आयोजन करण्यात येणार असून याच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करणे. तसेच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनासोबतच विक्री व्यवस्थापनाची माहिती देण्यात येईल. यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान देण्यासाठी शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना
जागतिक संत्रा महोत्सव आयोजनासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात विविध संस्था, संत्रा उत्पादक तसेच वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापौर नंदा जिचकार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महापालिकेचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, महाआॅरेंजचे श्रीधर ठाकरे, लोकमत समूहाचे निलेश सिंह आदी उपस्थित होते. अनिरुद्ध हजारे यांनी सादरीकरणाद्वारे महोत्सवाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. संत्रा महोत्सव आयोजनासाठी सर्व विभागांचा समन्वय राहावा यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी व आयोजनासाठी महापालिकेसह सर्व विभागांनी सहकार्य करावे,अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.
कृषी विभागाने घेतली बैठक, शेतकरीही उत्सुक 


जागतिक संत्रा महोत्सवात जागतिक स्तराच्या तंत्रांचे मार्गदर्शन मिळणार असल्याने या महोत्सवासाठी शेतकरीही उत्सुक आहेत. यासंदर्भात गुरुवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील शेतकरी भवन येथे कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी याची माहिती दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) ए. एम. कुसळकर यांनी मार्गदर्शन केले. लोकमतचे आतिश वानखेडे यांनी सादरीकरण केले. या बैठकीत झिरो माईल फार्मर प्रोड्युसर कंपनीचे आर. बी. पटेल, विनायक पोहणकर, आर. बी. पटेल, वाकोडी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे महेंद्र जनबंधू, मंगेश मदनकर यांच्यासह माँ दुर्गा शेतकरी उत्पादक कंपनी आणि भिवापूर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. संत्रा महोत्सवाबाबत हे प्रतिनिधी उत्सुक असल्याचे सांगितले. महोत्सवाला मोठ्या संख्येने शेतकरी विशेषत: संत्रा उत्पादक सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

Web Title: A new identity will be gotten to Nagpur's orange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.