उपराजधानीत कचरा संकलनासाठी नवीन ‘मॅनेजमेंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 10:41 AM2019-09-30T10:41:23+5:302019-09-30T10:43:46+5:30

नागपूर शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचा करार संपुष्टात आला आहे. महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे.

New 'management' for waste collection in Nagpur | उपराजधानीत कचरा संकलनासाठी नवीन ‘मॅनेजमेंट’

उपराजधानीत कचरा संकलनासाठी नवीन ‘मॅनेजमेंट’

Next
ठळक मुद्देकनकचे कंत्राट संपुष्टात संकलनाची जबाबदारी दोन कंपन्यांवरदीड महिन्यात ४७२ वाहने कुठून आणणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचा करार संपुष्टात आला आहे. महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. यात ए. जी. एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. ठाणे आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड, पुणे यांचा समावेश आहे. १६ नोव्हेंबरपासून घरोघरी कचरा संकलनाचे काम करणार आहे. यासाठी लहान-मोठ्या ४७२ वाहनांचा वापर केला जाणार असल्याचा दावा या कंपन्यांनी केला आहे. परंतु वाहन उत्पादक कंपन्यांनी उत्पादनात कपात केली आहे. अशा परिस्थितीत दीड महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने उपलब्ध होतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात दररोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निघतो. कनक रिसोर्सेसकडून कचरा संकलनासाठी ३०० वाहनांचा वापर केला जातो. परंतु नवीन कंपन्यांनी ४७२ वाहनांचा वापर करणार असल्याचा दावा सादरीकरणातून केला आहे. यात प्रामुख्याने डिझेल वाहनांचा समावेश आहे. अरु ंद रस्ते असलेल्या वस्त्यात ई-रिक्षाचा वापर केला जाणार आहे. कचरा संकलनाचे काम दोन सत्रात केले जाणार आहे. सकाळच्या सत्रात घरोघरी जाऊन कचरा संकलित केला जाईल. तर सायंकाळच्या सत्रात शहरातील प्रमुख बाजारापेठ असलेल्या भागातील कचरा संकलित केला जाणार आहे.
सध्या शहरात कचरा संकलनाची जबाबदारी केवळ कनक रिसोर्सेसकडे आहे. यासाठी महापालिका कंपनीला १ हजार ३६४ रुपये प्रति मेट्रिक टन असे शुल्क अदा करते. नव्या प्रणालीत महापालिकेने शहराची विभागणी दोन विभागात केली आहे. यात पॅकेज एक अंतर्गत १ ते ५ असे विभाग एजी एनव्हायरो, तर पॅकेज दोनअंतर्गत ६ ते ७ भाग बीव्हीजी कंपनीला सोपविण्यात आले आहे. कचरा संकलनाच्या नव्या योजनेंतर्गत दोन्ही कंपन्या शहरातील कचऱ्याचे दोन शिफ्टमध्ये संकलन करतील.

वर्षाला ५.३८ कोटींचा अतिरिक्त बोजा
बीव्हीजी इंडिया लिमिटेड, पुणे यांनी अनुक्रमे १६५६ व १८०० रुपये दराच्या वेगवेगळ्या निविदा सादर केल्या. प्रतिटन १६५६ रुपये दराने होणार होते. यासाठी आता १९०० रुपये प्रतिटन खर्च करावे लागणार आहे. दुसरीकडे कनक रिसोर्सेस कंपनीला प्रतिटन १४३६ रुपये दर मिळत आहे. एका पॅकेजमध्ये दिवसाला ५०० मेट्रिक टन कचरा निघतो. याचा विचार करता महापालिकेला वर्षाला ५ कोटी ३८ लाख ८ हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.

Web Title: New 'management' for waste collection in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.