म्युकरमायकोसिसचा टास्क फोर्समध्ये नवीन सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:40+5:302021-06-05T04:07:40+5:30
नागपूर : म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजाराच्या उपचाराकरिता व आवश्यक उपाययोजना करण्याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी २० ...
नागपूर : म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजाराच्या उपचाराकरिता व आवश्यक उपाययोजना करण्याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी २० मे रोजी ‘टास्क फोर्स’ची स्थापन केली. परंतु कार्यकक्षेची व्याप्ती वाढविण्यासाठी १० सदस्यांची टास्क फोर्स आता २२ करण्यात आली आहे. अध्यक्षपदी ‘असोसिएशन ऑफ ऑन्टोलॅरिन्गोलॉजिस्ट ऑफ इंडिया’, विदर्भ शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे कायम आहेत.
कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. या आजाराला आळा घालणे, गंभीर व अतिगंभीर रुग्णांचे व्यवस्थापन व योग्य औषधोपचार, जिल्ह्यातील डॉक्टरांना मार्गदर्शन व जनजागृती करणे, आदी उपाययोजनांवर हे ‘टास्क फोर्स’ काम करणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. निखाडे असून सदस्य म्हणून डॉ. आशिष थूल, डॉ. गिरीश भुतडा, डॉ. रामक्रिष्ण शिनॉय, डॉ. रवींद्र सरनाईक, डॉ. मिलिंद भ्रृशुंडी, डॉ. विपीन देहाने, डॉ. मिलिंद चांगोले, डॉ. श्याम बाभुळकर, डॉ. दिनेश अग्रवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.व्ही. पातूरकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, डॉ. उदय नार्लावार, डॉ. रवींद्र खडसे, डॉ. मीना मिश्रा, डॉ. नितीन शिंदे, डॉ. अश्विनी तायडे, डॉ. कमल भुतडा, डॉ. संजय चिलकर, डॉ. वर्षा देवस्थळे, रिता जॉन व सदस्य सचिव म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आदींचा सहभाग आहे.