सारस्वतांच्या प्रतिभेला भरारी मिळवून देण्यासासाठी नवे व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:49+5:302021-07-22T04:07:49+5:30
कुही : कुही तालुक्यात मराठी साहित्यांचे अनेक अभ्यासक आहे. पण त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी योग्य व्यासपाठीचा अभाव होता. या ...
कुही : कुही तालुक्यात मराठी साहित्यांचे अनेक अभ्यासक आहे. पण त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी योग्य व्यासपाठीचा अभाव होता. या सारस्वतांच्या प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळावे. त्यांनी साहित्य क्षेत्रात भरारी घ्यावी यासाठी मांढळ येथील विदर्भ साहित्य संघाच्या शाखेचे नूतनीकरण करण्यात आले. त्यानिमित्त बुधवारी मांढळ येथील श्री लेमदेव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात शाखा उद्घाटन व नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. रवींद्र शोभणे होते. उद्घाटक म्हणून विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, विदर्भ साहित्य संघाचे शाखा समन्वयक प्रदीप दाते आणि श्रीक्षेत्र आंभोरा देवस्थानचे अध्यक्ष रत्नाकर ठवकर, प्राचार्य प्रदीप रणदिवे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. शोभणे हे शासनाच्या अभ्यास मंडळावर सदस्य आहेत. त्यांनी आपला सदस्यपदाचा लाभ आमच्या भागाला मिळवून द्यावा. आंभोरा या तीर्थस्थळी ‘विवेकसिंधू’ रचियते म्हणून मराठीचे आद्यकवी स्वामी मुकुंदराज यांचे स्मारक व्हावे अशी सर्व सारस्वतांची मनिषा असल्याने त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा,अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. वि.सा.संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. यानंतर महाविद्यालय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
अशी आहे कार्यकारिणी
मार्गदर्शक- रत्नाकर ठवकर, अध्यक्ष-डॉ.अविनाश तितरमारे, कोषाध्यक्ष- डॉ.रामेश्वर पाटेकर, सचिव- राजीव बुद्धे, उपाध्यक्ष- प्रा.संजय तिजारे, प्रा. रवींद्र राठोड, प्रभाकर तांडेकर, प्रा. वैशाली देशमुख, सहसचिव - शरद सहारे, प्रकाश गोंडे, कार्यक्रम प्रमुख - प्रा. सुरेश नखाते, सदस्य - प्रा. विनय पाटील, डॉ.वीणा गंथाडे, प्रा. ज्योती गोंधुळे, चंद्रकांत डडमल, विद्या ठवकर, कल्पना नरंजे, प्रा. दिलीप गंथाडे, प्रा.श्रावण लांबट, प्रकाश तिजारे. सल्लागार समिती- अंबादास तितरमारे, विजय ठाकरे, प्रा. गजानन मांडेकर, प्रदीप घुमडवार, प्रा. प्रकाश कटमुसरे, पुरुषोत्तम राघोर्ते