हृदयाच्या कृत्रिम झडपेवर नवे झडप रोपण : राज्यातील पहिली शस्त्रक्रिया नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 08:25 PM2019-02-12T20:25:14+5:302019-02-12T20:32:26+5:30

छातीला चिरफाड न करता जांघेच्या शिरे मार्गे हृदयामधील पहिल्या कृत्रिम ‘मायट्रल’ झडपेवर नवीन झडप रोपण करण्याची (टीएमव्हीआय) राज्यातील पहिली शस्त्रक्रिया नागपुरात यशस्वी पार पडली. डॉ. के. जी. देशपांडे स्मृती केंद्रात झालेल्या या शस्त्रक्रियेने ६८ वर्षीय महिलेला जीवनदान मिळाले. देशात आतापर्यंत अशा १६ शस्त्रक्रिया झाल्या आहेत, अशी माहिती हृदय शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल देशपांडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

New prostate implant on the artificial valve of the heart: The first surgery in the state is in Nagpur | हृदयाच्या कृत्रिम झडपेवर नवे झडप रोपण : राज्यातील पहिली शस्त्रक्रिया नागपुरात

हृदयाच्या कृत्रिम झडपेवर नवे झडप रोपण : राज्यातील पहिली शस्त्रक्रिया नागपुरात

googlenewsNext
ठळक मुद्देजांघेच्या शिरेमार्गे केले हृदयात रोपण

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : छातीला चिरफाड न करता जांघेच्या शिरे मार्गे हृदयामधील पहिल्या कृत्रिम ‘मायट्रल’ झडपेवर नवीन झडप रोपण करण्याची (टीएमव्हीआय) राज्यातील पहिली शस्त्रक्रिया नागपुरात यशस्वी पार पडली. डॉ. के. जी. देशपांडे स्मृती केंद्रात झालेल्या या शस्त्रक्रियेने ६८ वर्षीय महिलेला जीवनदान मिळाले. देशात आतापर्यंत अशा १६ शस्त्रक्रिया झाल्या आहेत, अशी माहिती हृदय शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल देशपांडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
डॉ. देशपांडे म्हणाले, ६८ वर्षीय या महिलेचे २०११ मध्ये हृदयाचे झडप (व्हॉल्व्ह) खराब झाले होते. त्यावेळी ‘व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु मागील काही महिन्यांपासून त्यांना पुन्हा धाप लागणे, हृदयात धडधड होणे आणि दुखणे वाढले होते. यामुळे त्या पुन्हा ‘डॉ. के. जी. देशपांडे स्मृती केंद्रा’त उपचारासाठी आल्या. त्यांना वारंवार उपचारासाठी भरती करून घ्यावे लागत होते. डॉक्टरांनी केलेल्या ईको तपासणीत त्यांच्या हृदयाची झडप पुन्हा खराब झाल्याचे दिसून आले. यामुळे हृदयातील रक्त समोर न जाता पुन्हा मागे फिरत होते. रुग्ण महिलेचे वजन केवळ ३५ किलो होते. यामुळे पुन्हा शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. यावर दुसरा उपाय म्हणून खराब झालेल्या झडपेवर दुसरी झडप लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हे नवे तंत्र जगात पाच वर्षापूर्वीच आले. भारतात याला येऊन दोन वर्षे झाली. हृदय शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वैजनाथ व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल मुरुगन यांनी नवी उभारलेली नवी कंपनी ‘हार्ट टीम इंडिया’कडून ही शस्त्रक्रिया करण्याची योजना आखली. ही शस्त्रक्रिया जिथे कॅथलॅब व ‘हायब्रीड ऑपरेशन रुम’ उपलब्ध आहे तिथेच होते. रुग्णाकडून शस्त्रक्रियेसाठी संमती येताच या दोन्ही डॉक्टरांनी ७ फेब्रुवारीची तारीख दिली. या शस्त्रक्रिया वैद्यकीय भाषेत ‘ट्रान्सकॅथेटर मिट्रल व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन’ (टीएमव्हीआय) म्हणतात. शस्त्रक्रियेसाठी लागणारे व्हॉल्व्ह ब्राझीलमधून मागविण्यात आले. गुरुवारी शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. डॉ. देशपांडे म्हणाले, ज्या पद्धतीने अ‍ॅन्जिओग्राफी केली जाते त्याच पद्धतीने जांघेच्या शिरातून कॅथेटर टाकण्यात आले. ‘टीशू व्हॉल्व’ हृदयाच्या डाव्या बाजूला बसवायचे होते. कॅथेटर उजव्या बाजूला गेले. दोन हृदयकप्प्यातील पडद्यास छिद्र पाडून डावीकडील ‘मायट्रल व्हॉल्व’चा वर नवी झडप लावण्यात आली. टेबलवरच इकोद्वारे चाचणी करून ‘व्हॉल्व’ योग्य जागी व पक्के बसल्याची खात्री करण्यात आली. विशेष म्हणजे, व्हॉल्व लावताच हृदयाची क्रिया व गती सुरळीत झाल्याने रक्तदाबही सामान्य झाला. देशातील १६ वी तर राज्यातील ही पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ही शस्त्रक्रिया सुरू असताना ‘ओपन हार्ट सर्जरी’ करणारी चमूही तयार ठेवण्यात आली होती. परंतु तशी वेळ आली नाही. या शस्त्रक्रियेमुळे महिलेला नवे जीवन मिळाले. 
  ही शस्त्रक्रिया हृदय शल्यचिकित्सक डॉ. पी.के. देशपांडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विकास बिसेन, हृदय शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल देशपांडे, हृदय भूलतज्ज्ञ डॉ. एस.के. देशपांडे, डॉ. ज्योती पान्हेकर, वैद्यकीय चिकित्सक डॉ. प्रभाकर देशपांडे, डॉ. अनिल मोडक, डॉ. उदय पराडकर, एम. के. देशपांडे, डॉ. मनिषा देशपांडे, इरशाद अहमद, अतुल सरोदे आदींच्या सहकार्यातून करण्यात आली. 

Web Title: New prostate implant on the artificial valve of the heart: The first surgery in the state is in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.