उच्च न्यायालयात सोमवारपासून नवीन रोस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:17+5:302021-06-30T04:07:17+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील रोस्टरमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन रोस्टर येत्या सोमवारपासून लागू होणार आहे. ...

New roster in the High Court from Monday | उच्च न्यायालयात सोमवारपासून नवीन रोस्टर

उच्च न्यायालयात सोमवारपासून नवीन रोस्टर

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील रोस्टरमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन रोस्टर येत्या सोमवारपासून लागू होणार आहे. यासंदर्भात मंगळवारी नोटीस जारी करण्यात आली.

नवीन राेस्टरनुसार, न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्याकडे सर्व दिवाणी रिट याचिका व जनहित याचिका, न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांच्याकडे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क अर्ज, संदर्भ व अपील्स, प्रथम अपील्स, कुटुंब न्यायालय अपील्स, अवमानना अपील्स, अवमानना याचिका, न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्याकडे फौजदारी अपील्स, फौजदारी रिट याचिका, न्या. स्वप्ना जोशी यांच्याकडे अपील्स अगेन्स्ट ऑर्डर, न्या. रोहित देव यांच्याकडे नियमित जामीन अर्ज, २०११ पर्यंतच्या फौजदारी अपील्स, फौजदारी रिव्हिजन अर्ज, न्या. मनीष पितळे यांच्याकडे फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज, न्या. श्रीराम मोडक यांच्याकडे द्वितीय अपील्स व त्यातील किळकोळ अर्ज, न्या. विनय जोशी यांच्याकडे २०१२ व त्यापुढील वर्षांतील फौजदारी अपील्स, सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतचे अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज, न्या. नितीन सूर्यवंशी यांच्याकडे दिवाणी रिट याचिका, दिवाणी रिव्हिजन अर्ज तर, न्या. पुष्पा गणेडीवाला यांच्याकडे प्रथम अपील्स व किरकोळ दिवाणी अर्जांचे कामकाज राहील.

Web Title: New roster in the High Court from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.