नागपुरातील नवीन सचिवालय इमारतीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:26 PM2020-06-16T21:26:28+5:302020-06-16T21:29:20+5:30

अनेक महत्त्वपूर्ण केंद्रीय कार्यालय असलेल्या नवीन सचिवालयाच्या इमारतीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची गळती सुरू आहे, मात्र डागडुजी करण्याबाबत गंभीरपणे दखल घेताना कुणी दिसत नाही.

New Secretariat building in Nagpur collapses | नागपुरातील नवीन सचिवालय इमारतीला गळती

नागपुरातील नवीन सचिवालय इमारतीला गळती

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अनेक महत्त्वपूर्ण केंद्रीय कार्यालय असलेल्या नवीन सचिवालयाच्या इमारतीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची गळती सुरू आहे, मात्र डागडुजी करण्याबाबत गंभीरपणे दखल घेताना कुणी दिसत नाही.
सिव्हिल लाईन्स येथे जिल्हाधिकारी कार्यालय व उर्सुला हायस्कूलच्या बाजूलाच केंद्रीय सचिवालयाची प्रशस्त इमारत आहे. या इमारतीत केंद्राच्या जलवायू परिवर्तन विभागासह केंद्रीय भूजल संवर्धन विभागाच्या अंतर्गत विविध विभाग, केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभाग, केंद्रीय बुनकर सेवा केंद्र, श्रम मंत्रालय विभाग आदी महत्त्वपूर्ण कार्यालये आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून इमारतीच्या प्रवेशद्वारावर पाणी गळती सुरू आहे. पाऊस सुरू होण्याच्या आधीपासून एसीचे पाणी गळत होते व आता पावसाचे पाणी गळने सुरू आहे. मात्र इतक्या दिवसापासून एकही विभागाने किंवा प्रशासकीय व्यवस्थापकाने गळती थांबण्यासाठी डागडुजी करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. इतक्या महत्त्वपूर्ण कार्यालयाची अशी अवस्था दुर्लक्षित केली जात आहे.

Web Title: New Secretariat building in Nagpur collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.