नवीन शिक्षण पद्धती शिक्षणक्षेत्रातील उणिवा भरून काढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:08 AM2020-12-24T04:08:08+5:302020-12-24T04:08:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट शिक्षण पद्धतीची गरज आहे. वर्तमान शिक्षण पद्धतीमधून समाधानकारक परिणाम प्राप्त झालेले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट शिक्षण पद्धतीची गरज आहे. वर्तमान शिक्षण पद्धतीमधून समाधानकारक परिणाम प्राप्त झालेले नाहीत. त्या उणिवा नवीन शिक्षण पद्धती दूर करेल, असा आशावाद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. कमल सिंग यांनी व्यक्त केला.
अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज, हरिद्वारच्या अंतर्गत गायत्री परिवार नागपूरच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. यावेळी, विशेष पाहुणे म्हणून शासकीय दंत महाविद्यालय, नागपूरच्या माजी अधिष्ठाता डॉ. पुष्पा हजारे उपस्थित होत्या.
डॉ. पुष्पा हजारे यांनीही नव्या शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करताना राष्ट्रनिर्माणात सहयोग देणारे विद्यार्थी घडविणारी ही पद्धती असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविक दीपक बिडवई यांनी केले. संचालन संध्या गुप्ता यांनी केले तर आभार विजय सोलंकी यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय गौरव बिसेन व गीता सूर्यवंशी-झाडे यांनी करवून दिला. या ऑनलाईन कार्यक्रमाला सत्यनारायण नुवाल, प्रणय शेगावकर, दीपाली, गजानन उपस्थित होते.