जैवविविधतेने नटलेल्या अंबाझरी उद्यानाची नवी वेबसाईट येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 01:37 AM2020-09-23T01:37:51+5:302020-09-23T01:39:12+5:30

जैवविविधतेने नटलेल्या अंबाझारी उद्यानाची नवी वेबसाईट वन विभागाकडून तयार केली जाणार आहे. विशेष म्हणजे या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर असलेले छायाचित्र हौशी छायाचित्रकारांकडून मागवले जाणार आहे.

A new website for the biodiversity-rich Ambazari garden will be launched | जैवविविधतेने नटलेल्या अंबाझरी उद्यानाची नवी वेबसाईट येणार

जैवविविधतेने नटलेल्या अंबाझरी उद्यानाची नवी वेबसाईट येणार

Next
ठळक मुद्देहौशी छायाचित्रकारांनाही संधी : वेबसाईटवरून होणार जैवविविधतेचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जैवविविधतेने नटलेल्या अंबाझारी उद्यानाची नवी वेबसाईट वन विभागाकडून तयार केली जाणार आहे. विशेष म्हणजे या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर असलेले छायाचित्र हौशी छायाचित्रकारांकडून मागवले जाणार आहे.
अंबाझरी जैवविविधता उद्यान हे विविध प्रकारचे प्राणी, फुलपाखरे, मासे आणि विविध प्रजातीच्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे. या उद्यानामध्ये अनेक प्रकारची वृक्षराजी असून वैविध्यपूर्ण असलेले हे जंगल आहे. पर्यटक, हौशी छायाचित्रकार आणि नागरिकांसाठी हे शहरातील उत्तम पर्यटन पर्यटन स्थळ बनवावे यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. या उद्यानाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक नवीन वेबसाईट तयार केली जात आहे. विशेष म्हणजे गेट तिकीट ऑनलाईन सिस्टीमने प्राप्त करण्यासाठी तसेच अन्य सुविधा मिळवण्यासाठी या वेबसाईटचा वापर पर्यटकांना करता येणार आहे.

छायाचित्रकारांना संधी
अंबाझरी उद्यानाच्या प्रस्तावित वेबसाईटच्या मुखपृष्ठावर झळकण्याची संधी हौशी छायाचित्रकारांना मिळणार आहे. यासाठी अंबाझरी उद्यानाच्या व्यवस्थापनाने हौशी छायाचित्रकारांसाठी छायाचित्र स्पर्धा ठेवली आहे. छायाचित्रकारांनी या उद्यानाचे अधिकाधिक पाच निवडक फोटो २५ सप्टेंबरपर्यंत अंबाझरी उद्यानाच्या वेबसाईटवर पाठवायचे आहेत. येथील जैवविविधता दाखवणारी ही छायाचित्रे असावी. सर्वोत्कृष्ट छायाचित्राची निवड करून ते अंबाझरीच्या ऑफिशियल वेबसाईटच्या कव्हर पेजवर दिले जाणार आहे. विशेष म्हणजे संबंधित हौशी छायाचित्रकाराला त्याच्या छायाचित्राचे श्रेय दिला जाणार आहे. ही स्पर्धा नसून केवळ अंबाझरीच्या जैवविविधतेचे दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून पर्यटकांना व्हावे, हा यामागील हेतू आहे. त्यामुळे यासाठी बक्षीस ठेवण्यात आले नसल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

अंबाझरी जैवविविधता उद्यान अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी नवीन आॅफिशियल वेबसाईट तयार केली जात आहे. या वेबसाईटवर येथील जैवविविधतेचे उत्तम प्रदर्शन करणारे छायाचित्र हौशी छायाचित्रकारांकडून आम्ही स्पर्धात्मक दृष्टीने मागवत आहोत.
- प्रभु नाथ शुक्ल, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग

Web Title: A new website for the biodiversity-rich Ambazari garden will be launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.