देशासाठी नवीन वर्ष अस्थिरतेचे

By admin | Published: December 30, 2014 12:52 AM2014-12-30T00:52:17+5:302014-12-30T00:52:17+5:30

हर्षल-नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांची त्रयी ही २०१५ या वर्षात अस्थिरता निर्माण करणार असून, येणारे वर्ष देशासाठी अस्थिरता व अशांततेचे राहणार आहे, असे भाकीत आंतरराष्ट्रीय

New year instability for the country | देशासाठी नवीन वर्ष अस्थिरतेचे

देशासाठी नवीन वर्ष अस्थिरतेचे

Next

हर्षल-नेपच्यून-प्लुटो आणणार अशांतता : ज्योतिषाचार्य अनिल वैद्य यांचे भाकीत
नागपूर : हर्षल-नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांची त्रयी ही २०१५ या वर्षात अस्थिरता निर्माण करणार असून, येणारे वर्ष देशासाठी अस्थिरता व अशांततेचे राहणार आहे, असे भाकीत आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी वर्तविले आहे.
ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांच्यानुसार भारताच्या मकर राशीकडून तृतीय आणि नवम स्थानातून २०१५ या वर्षातील ग्रहणे होत असल्यामुळे, या वर्षात होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये गोंधळ निर्माण होईल. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय खेळाडूंना अपयश संभवते. विश्व क्रिकेट स्पर्धेत धोनी ब्रिगेडने सावध राहणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या खेळाडूंना यावर्षी निवृत्ती घ्यावी लागेल. यावर्षी होणाऱ्या ग्रहणाचा परिणाम म्हणजे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस होण्याचे ग्रह संकेत आहेत. सीमाप्रश्न पुन्हा चर्चेत येईल. ३७० कलमावरून काश्मीरमध्ये तणाव निर्माण होईल. विदर्भात वेगळ्या विदर्भाची मागणी वाढेल. पाकिस्तान, चीनच्या सीमा अशांत राहतील. ग्रहणाच्या जवळपास देशाची अंतर्गत शांतता बिघडण्याचे ग्रहसंकेत मेदिनीय ज्योतिष दर्शवीत आहे, असेही आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
सायन पद्धतीने प्लुटोचे भ्रमण मकर राशीतून चालू राहणार आहे. याचा परिणाम उद्योगधंदे, कामगार, श्रमजीव संघटना, राजकीय क्रांती, मोठ्या व्यक्तींचे स्फोटक, अपघाती मृत्यू तसेच मोठे उद्योग बंद पडण्याची शक्यता जास्त राहणार आहे. कन्या राशीतील राहूमुळे जो निसर्ग कुंडलीच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करीत आहे. त्यामुळे संसर्गजन्य विकार वाढतील. पोलीस, सेना यांना हे वर्ष त्रासदायक राहणार आहे. मीनेतील केतूच्या भ्रमणामुळे विमानसेवा किंवा अंतराळ यान यांच्या सेवेत खंड पडेल. उपग्रहाच्या सेवेत बिघाड होईल, असे भाकीतही डॉ. वैद्य यांनी केले आहे. भारताच्या मकर राशीतून शनिचे भ्रमण लाभस्थानातून होत आहे. यामुळे देशातील सामान्य जनतेच्या दृष्टीने अनुकूल बदल होतील. गरीब जनतेसाठी नवे कायदे, घटना अस्तित्वात येतील. परंतु लाभस्थानात शनि असल्यामुळे देशाच्या उत्पन्नात घट होईल.
वर्षाच्या पूर्वार्धात कर्केच्या गुरूमुळे शिक्षण व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल. अभ्यासक्रमात मोठे बदल होतील. विमा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धार्मिक पक्ष किंवा धार्मिक व्यक्तींना महत्त्व प्राप्त होईल, असे ग्रहसंकेत असल्याचे डॉ. वैद्य यांचे म्हणणे आहे. २०१५ च्या ग्रहस्थितीनुसार डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होईल. धार्मिक कलह रोखण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील. प्रसार माध्यमांसाठी काही मार्गदर्शक सूत्रे अमलात येण्याची शक्यता आहे. तसेच नेटवर्कच्या काही साईटस्वर बंदी घालण्याचे ग्रहसंकेत असल्याचेही डॉ. वैद्य यांनी सांगितले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: New year instability for the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.