नववर्षातील कोरोनाचा ब्लास्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:13 AM2021-02-18T04:13:23+5:302021-02-18T04:13:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाबाबत वाढलेली बेफिकिरी, कमी झालेला मास्कचा वापर फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा आणि सॅनिटायझरच्या कमी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाबत वाढलेली बेफिकिरी, कमी झालेला मास्कचा वापर फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा आणि सॅनिटायझरच्या कमी झालेल्या वापरामुळे नागपुरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या सात दिवसात तब्बल ३२८९ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज बुधवारी तर तब्बल ५९६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, असून ५ जणांचा मृत्यू झाला. नवीन वर्षातील कोरोना रुग्णांचा हा उच्चांक आहे.
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आली होती. परंतु मागील सात दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. ११ फेब्रुवारी रोजी तब्बल ६६ दिवसांनंतर पहिल्यांदा ५०० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही संख्या कमी होऊन ३१९ वर आली. परंतु १३ तारखेपासून १६ तारखेपर्यंत यात सातत्याने वाढ होत गेली. बुधवारी त्याने उच्चांक गाठला.
बुधवारी ५९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात शहरातील ४९९ , ग्रामीणमधील ९५ आणि जिल्ह्याबाहेरच्या २ रुग्णांचा समावेश आहे. तर ५ मृत्यूमध्ये शहरातील ग्रामीणमधील २, शहरातील १ व जिल्ह्याबाहेरचे २ जण आहेत. बुधवारी २७९ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सध्या नागपुरात ४७१७ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यात शहराील ३९२५ आणि ग्रामीणमधील ७९२ रुग्णांचा समावेश आहे.
नागपुरात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,४०,३८४ इतकी झाली आहे. यात शहरातील १,११,९१५, ग्रामीणमधील २७,५५५ व जिल्ह्याबाहेरचे ९१४ जणांचा समावेश आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या १,३१,४२० वर पोहोचली आहे. यात शहरातील १,०५,२३६ , ग्रामीणमधील २६,१८४ जण आहेत. कोरोनाने आतापर्यंत ४२४७ जणांचा मृत्यू झाला असून, यात शहरातील २७५४, ग्रामीणमधील ७६१ आणि जिल्ह्याबाहेरच्या ७३२ जणांचा समावेश आहे.
बॉक्स
ॲक्टिव्ह रुग्ण - ४७१७
बरे झालेले - १,३१,४२०
एकूण मृत - ४२४७
बॉक्स
या आठवडाभरातील परिस्थिती
११ फेब्रुवारी ५०० पॉझिटिव्ह, ५ मृत्यू
१२ फेब्रुवारी ३१९ पॉझिटिव्ह, ४ मृत्यू
१३ फेब्रुवारी -४८६ पॉझिटिव्ह, ५ मृत्यू
१४ फेब्रुवारी -४५५ पॉझिटिव्ह, ६ मृत्यू
१५ फेब्रुवारी -४९८ पॉझिटिव्ह, ६ मृत्यू
१६ फेब्रुवारी -४३५ पॉझिटिव्ह, ६ मृत्यू
१७ फेब्रुवारी ५९६ पॉझिटिव्ह, ५ मृत्यू