गरीब मुलाशी लग्न झाल्याने नवविवाहितेने स्वत:ला संपविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 07:46 PM2022-02-02T19:46:10+5:302022-02-02T19:46:55+5:30
Nagpur News कुटुंबीयांनी गरीब घरात लग्न लावून दिल्याने एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.
नागपूर : कुटुंबीयांनी गरीब घरात लग्न लावून दिल्याने एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली. मंगळवारी (दि.१) जलालखेडा येथे अश्विनी रणमले (२५) या नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांना अश्विनीची डायरी मिळाली आहे. यात तिने लग्न झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अश्विनीचे हरिदास रणमले (रा. घानमुख ता. महागाव जि. यवतमाळ) याच्याशी २९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न झाले होते. हरिदास याला २०२० मध्ये शिक्षक म्हणून नोकरी लागली. त्याची नियुक्ती वाढोणा येथील जिल्हा परिषद शाळेत आहे. तीन वर्षापर्यंत शिक्षणसेवक असल्यामुळे त्याला ६ हजार मानधन मिळत आहे. लग्न झाल्यानंतर तो ७ जानेवारीपासून जलालखेडा येथे वास्तव्यास आहे. पती-पत्नी व पत्नीची आजी जलालखेडा येथे भाड्याने राहत होते. पती शाळेत गेल्यावर व आजी गावी गेल्यानंतर मंगळवारी दुपारी ३ वाजताना अश्विनीने गळफास लावून आत्महत्या केली होती.
अश्विनीचे वडील बाबूराव बरमटेके वनविभागात होते. तिची माहेरकडील परिस्थिती सधन होती. अश्विनीच्या घरातील सर्व सदस्य उच्चशिक्षित व नोकरीवर आहेत. बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव व ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह अश्विनी आणि हरिदासच्या खोलीची तपासणी केली. यात त्यांना अश्विनीची डायरी मिळाली. यात नमूद असलेल्या माहितीवरून अश्विनीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे.
काय लिहिले अश्विनीने..
‘ज्या दिवशी माझे साक्षगंध झाले तो माझ्या जीवनातील काळा दिवस होता. माझे एका गरीब घरात लग्न करून देण्यात आले. माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यापेक्षा गरीब आहेत. त्यांचे लग्न श्रीमंत घरी व उच्चशिक्षित मुलाशी झाले आहे. परंतु माझा सर्व परिवार उच्चशिक्षित असून माझे लग्न अशा गरीब घरात करण्यात आले.