प्रेमविवाहाचा करुण अंत! विवाहितेची सातव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 11:25 AM2021-10-08T11:25:09+5:302021-10-08T11:39:04+5:30

 बेलतरोडीच्या जयंतीनगरीत एका विवाहितेने सातव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. प्रेम विवाहाच्या तीन वर्षातच तिने हे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

The newlyweds jumped from the seventh floor | प्रेमविवाहाचा करुण अंत! विवाहितेची सातव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या

प्रेमविवाहाचा करुण अंत! विवाहितेची सातव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या

Next

नागपूर : बेलतरोडीच्या जयंतीनगरीत एका विवाहितेने सातव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना  उघडकीस आली आहे. ऋतु पंकज खडसे (३१) असे विवाहितेचे नाव आहे.

लग्न म्हटलं की दोन जीवांचं नव्हे दोन कुटुंबाचं मिलन अस आपल्या समाजात मानले जाते. मात्र, यावरील विश्वासहार्तता किती, हा ही एक प्रश्नच आहे. दररोज कौटुंबिक हिंसाचाराच्या कित्येक घटना आपल्या समोर येतात. त्यातही प्रेमविवाह करणाऱ्यांना दोन्ही घरच्यांच्या नाराजीतून जावे लागते.  

ऋतु आणि अभियंता पंकज खडसे यांचे नाते मैत्रीतून प्रेमात फुलले. दोघांनी सुखी संसाराची स्वप्ने पाहणे सुरू केले व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पाहता-पाहता या लग्नाला ३ वर्ष लोटली. पंकज एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. दोघेही जयंतीनगरीत सातव्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते. 

बुधवारी सकाळी ११.३० वाजता ऋतुने गॅलरीतून उडी घेतली यात तिचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ऋतुच्या नातेवाइकांना याची सूचना दिली. पोलिसांनी फ्लॅटची तपासणी केली; परंतु त्यांना आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली कोणतीच चिठ्ठी आढळली नाही. कौटुंबिक वादातून तिने आत्महत्या केल्याची शंका आहे.

घटनेपूर्वी तिचा पती पंकज सोबत वाद झाल्याची माहिती आहे. ती पंकजवर शंका घेत होती. ऋतुच्या आई-वडिलांचे बयाण झाल्यावरच तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकते. प्रेम विवाहाच्या तीन वर्षातच तिने आत्महत्या केल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: The newlyweds jumped from the seventh floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.