लॉकडाऊनबाबतचे वृत्त खोटे : अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 01:14 AM2020-07-30T01:14:07+5:302020-07-30T01:16:31+5:30

शहरात आणि जिल्ह्यात रक्षाबंधन व ईद या काळात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत चुकीची माहिती शेअर होत आहे. यासंदर्भात लॉकडाऊनबाबतचे ते वृत्त खोटे असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

News about lockdown is false: Strict action will be taken against those who spread rumors | लॉकडाऊनबाबतचे वृत्त खोटे : अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

लॉकडाऊनबाबतचे वृत्त खोटे : अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची स्पष्टोक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात आणि जिल्ह्यात रक्षाबंधन व ईद या काळात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत चुकीची माहिती शेअर होत आहे. यासंदर्भात लॉकडाऊनबाबतचे ते वृत्त खोटे असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात कोणतीही बैठक झाली नाही, त्यामुळे लॉकडाऊन लावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असेही विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमांवर अत्यंत चुकीची व जनतेची दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे, सायबर सेल मार्फ त संपूर्ण चौकशी करून अशा अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

...तर चार दिवस आधी माहिती देण्यात येईल
पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनसंदर्भात विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांची समिती निर्णय घेऊन चार दिवस आधी जनतेला माहिती देऊनच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. सध्या तरी लॉकडाऊनचा निर्णय झालेला नाही, अथवा या संदर्भात कुठलीही बैठक झालेली नाही, त्यामुळे लॉकडाऊन लागू होण्याचा प्रश्नच नाही. तशी वेळ आलीच तर तर नागरिकांना चार दिवसाआधी त्याची माहिती दिली जाईल. त्यामुळे नागरिकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: News about lockdown is false: Strict action will be taken against those who spread rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.