कोरोनाकाळात वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित आहेत : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 09:08 PM2021-02-20T21:08:48+5:302021-02-20T21:11:21+5:30

Nitin Gadkari २०२० हे वर्ष अनेकार्थाने महत्त्वाचे ठरले. या काळात आपण काहीच करू शकत नव्हतो. अखेर ‘आपल्या कोविड १९सोबत जगण्याची कला विकसित करावी लागेल’ या विश्वासावर पोहोचावे लागले. अशा काळात कोरोना योद्ध्यांसह वृत्तपत्रांनी समाजाचे मार्गदर्शन केले. या काळात तर वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

Newspapers are boosting the confidence of the society in the Corona era: Nitin Gadkari | कोरोनाकाळात वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित आहेत : नितीन गडकरी

 ‘दी २०२० क्वॉरंटाईम’चे विमोचन आभासी माध्यमाद्वारे करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा तर व्यासपीठावर लेखिका चैताली बांगरे व ॲड. फिरदौस मिर्झा

Next
ठळक मुद्दे चैताली बांगरे यांच्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’चे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०२० हे वर्ष अनेकार्थाने महत्त्वाचे ठरले. या काळात आपण काहीच करू शकत नव्हतो. अखेर ‘आपल्या कोविड १९सोबत जगण्याची कला विकसित करावी लागेल’ या विश्वासावर पोहोचावे लागले. अशा काळात कोरोना योद्ध्यांसह वृत्तपत्रांनी समाजाचे मार्गदर्शन केले. या काळात तर वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

प्रसिद्ध लेखिका चैताली बांगरे यांनी कोरोना व टाळेबंदीच्या काळातील अनुभवांवर लिहिलेल्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिव्हील लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये पार पडला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी नितीन गडकरी व लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा हे आभासी माध्यमाद्वारे सोहळ्यात सहभागी झाले होते तर व्यासपीठावर प्रख्यात अधिवक्ता फिरदौस मिर्झा व चैताली बांगरे उपस्थित होते.

कोरोना ही एक आपत्ती आहे आणि संक्रमणाची गती आणखी वाढायला लागली आहे. अशा स्थितीत आपत्तीचे रूपांतरण इष्टापत्तीत करण्यासाठी प्रचंड चिंतनाची गरज आहे. समस्या उद्भवल्या तर मार्गही शोधावाच लागतो. आपल्याकडे पीपीई किट नव्हत्या तर नागपुरात निर्माणाच्या संधी शोधून त्याचा पुरवठा केला गेला. सॅनिटायझर हजार रुपये लिटर विकले जात होते. तेव्हा नागपूरच्या शुगर कारखान्यातच अल्कोहोलद्वारे सॅनिटायझर निर्माण करवून ते दीडशे रुपये लिटर पर्यंत सर्वसामान्यांना उपलब्ध करता आले. एकमेकांची मदत करण्याची वृत्ती याच काळात दिसून आली. समाजाची ही शक्ती आपल्या जीवनमूल्यांची देण असल्याची भावना नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

या काळाने वेळेचे महत्त्व कळले आणि नातेवाईक, घर आणि जबाबदारीचे महत्त्व सगळ्यांना कळले. कोरोना हे संकट असले तरी या संकटाने आपुलकीची जाणिवही करवून दिली, अशी भावना विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन आरजे नमन यांनी केले तर आभार विनय पाण्डे यांनी मानले.

Web Title: Newspapers are boosting the confidence of the society in the Corona era: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.