‘एनएचएआय’ने केलीच नाही १० लाख झाडांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:28+5:302021-03-06T04:07:28+5:30
मिळालेल्या एका हास्यास्पद माहितीने तर ‘एनएचएआय’च्या गणितावरच प्रश्न उपस्थित हाेताे. या विभागाने लागवड केल्यापेक्षा जगलेली झाडे जास्त आहेत. छत्तीसगड-महाराष्ट्र ...
मिळालेल्या एका हास्यास्पद माहितीने तर ‘एनएचएआय’च्या गणितावरच प्रश्न उपस्थित हाेताे. या विभागाने लागवड केल्यापेक्षा जगलेली झाडे जास्त आहेत. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील ८० किलोमीटरच्या महामार्गासाठी १०,७०१ झाडे कापली. त्यानंतर ‘एनएचएआय’ने २१,५६० झाडांची लागवड केल्याचे नमूद केले आहे परंतु जगलेल्या झाडांचा आकडा २४,१२३ इतका आहे. दुसरे एक उदाहरण बाेरखेडी-जाम-वडनेर या ५७ किलोमीटर महामार्गाच्या कामाचे आहे. येथे प्राधिकरणाने २१,४२८ झाडांची लागवड केल्याचे सांगितले. मात्र, जगलेल्या झाडांची संख्या ४७,०९८ असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे लावली झाडे कमी आणि जगली जास्त, हे गणित काही केल्या समजेनासे झाले आहे.
इंडियन राेड काॅंग्रेसच्या २००९च्या नियमानुसार ‘एनएचएआय’ने १० लाख झाडे लावली नाहीत, हे धक्कादायक आहेच. मात्र, नवीन मार्गदर्शक तत्वानुसार प्रति किलाेमीटर रस्त्याच्या एकाकडेला ५८३ व दुसरीकडेही तेवढीच अशी १,१६६ झाडे लावणे बंधनकारक आहे. यावरून अजनीमध्ये वृक्षताेड केल्यानंतर नियमानुसार झाडे लावण्याचा प्राधिकरणाचा दावा हास्यास्पद वाटताे.
- जयदीप दास, माजी मानद वन्यजीव संरक्षक