अभियंत्याच्या अपघाती मृत्यूनंतर ‘एनएचएआय’ला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:09 AM2021-09-18T04:09:09+5:302021-09-18T04:09:09+5:30

नागपूर : सदर उड्डाणपुलावरून पडून अभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर एनएचएआय खडबडून जागी झाली. शुक्रवारी सकाळी वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी घटनास्थळी साईन ...

The NHAI woke up after the accidental death of the engineer | अभियंत्याच्या अपघाती मृत्यूनंतर ‘एनएचएआय’ला आली जाग

अभियंत्याच्या अपघाती मृत्यूनंतर ‘एनएचएआय’ला आली जाग

googlenewsNext

नागपूर : सदर उड्डाणपुलावरून पडून अभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर एनएचएआय खडबडून जागी झाली. शुक्रवारी सकाळी वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी घटनास्थळी साईन बोर्ड लावण्यात आला आहे. तीन महिन्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी एनएचएआयला घटनास्थळी डायर्व्हशन पॉईंटच्या आधी साईन बोर्ड लावण्याची तसेच भिंतीची उंची वाढविण्यासह अनेक शिफारशी केल्या होत्या. या शिफारशींची अंमलबजावणी केली असती तर जीवन जुमनाकेला आपला जीव गमवावा लागला नसता.

गुरुवारी रात्री बाईकवर स्वार काटोल येथील रहिवासी जीवन जुमनाके (३०) यांचा सदर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू झाला होता. जीवन मुंबईच्या आयटी कंपनीत कार्यरत होता. त्याची बहीण रेल्वे क्वाॅर्टरमध्ये राहते. गुरुवारी सायंकाळी तो काटोलवरून नागपूरला आला होता. दरम्यान त्याचा अपघात झाला. जीवन काटोल मार्गाकडून सदरकडे जात होता. मेश्राम चौकाच्या उड्डाणपुलावर डायर्व्हशन आहे. काटोल मार्गाकडून येणाऱ्या वाहनचालकांना अनेकदा डायर्व्हशन असल्याचे दुरुन दिसत नाही. डायर्व्हशन पॉईंट जवळ आल्यानंतर अचानक ब्रेक लावल्यामुळे अपघात होतात. जीवनचा अपघातही याच पद्धतीने झाला आणि तो उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकला. हवेत उसळल्यामुळे तो ५० फूट खाली रस्त्यावरील कारच्या छतावर पडून मृत्यू पावला. सूत्रांनुसार वाहतूक शाखेने तीन महिन्यांपूर्वी एनएचएआयला उड्डाणपुलावरील अपघात थांबविण्यासाठी काही सूचना केल्या होत्या. यात डायर्व्हशन पॉईंटवर साईन बोर्ड लावणे, भिंतीची उंची वाढविणे या सूचनांचा समावेश होता. परंतु अपघात झाल्यानंतर घाईगडबडीत आज सकाळी साईन बोर्ड लावण्यात आला. एनएचएआयचे परियोजना संचालक अभिजित जिचकार, वाहतूक शाखेचे निरीक्षक जगवेंद्र राजपूत आणि सदरचे निरीक्षक विनोद चौधरी यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. जाणकारांच्या मते उड्डाणपुलाच्या डायर्व्हशन पॉईंटसह अनेक ठिकाणे अपघातामुळे चर्चेत राहिले आहेत. उड्डाणपुलाच्या आरबीआयकडील टोकाच्या उद्घाटनानंतर अनेकदा अपघात झाले आहेत. येथे अनेकदा वाहतूक विस्कळीत होते. बहुतांश वेळा वाहतूक पोलिसही तेथे राहत नाहीत.

...........

वर्षभरापूर्वी झाले होते लग्न

जीवनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. पत्नी मुंबईत कार्यरत आहे. वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. कुटुंबात विधवा आई आणि पत्नी आहे. जीवन आठवडाभरापूर्वी मित्राच्या लग्नासाठी काटोलमध्ये आला होता. गुरुवारी लग्नात सहभागी होण्यासाठी तो नागपूरला येत होता. लग्न आटोपल्यानंतर अजनी बहिणीच्या घरी बाईक ठेवून तो मुंबईला जाणार होता.

...........

Web Title: The NHAI woke up after the accidental death of the engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.