विमानतळावर पुन्हा नायजेरियन प्रवाशाला पकडले
By admin | Published: September 30, 2016 03:14 AM2016-09-30T03:14:32+5:302016-09-30T03:14:32+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)च्या चमूने गुरुवारी सायंकाळी पुन्हा एका नायजेरियन युवकाला पकडले.
व्हिसाची मुदत संपली होती
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)च्या चमूने गुरुवारी सायंकाळी पुन्हा एका नायजेरियन युवकाला पकडले. पेक्स उजूग्वे फर्डिनेंड मेलोडू असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याच्या व्हिसाची मुदत संपली होती.
गुरुवारी सायंकाळी ५.२५ वाजता जेट एअरवेजच्या फ्लाईटने नायजेरियन नागरिक पेक्स उजूग्वे फर्डिनेंड मेलोडू मुंबईला जाणार होता. सूत्रानुसार आयबीला यासंबंधात गुप्त माहिती मिळाली होती. अशीही शंका वर्तविण्यात आली होती की, बेकायदेशीररीत्या इतर तीन व्यक्ती सुद्धा प्रवास करीत आहेत. सध्या पकडल्या गेलेल्या युवकाची विचारपूस केली जात आहे. २६ सप्टेंबर रोजी सुद्धा नागपूर विमानतळावर एका नायजेरियन प्रवाशाला पकडण्यात आले होते. एरिप जॉन कॅमेले असे त्याचे नाव होते. मुंबई आणि नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये एका वर्षापासून बोगस पासपोर्ट आणि व्हिसासह ते फिरत होते. हा प्रवासी सुद्धा मुंबईला जाण्याच्या तयारीत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील संवेदनशील विमानतळापैकी एक आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक आहे. येथून बोगस कागदपत्राद्वारे बाहेर पडणे कठीण आहे. (प्रतिनिधी)