उत्तररात्री विमानाची मेडिकल इमर्जन्सी लॅण्डिंग : हार्टअटॅकने प्रवाशाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 09:47 PM2021-06-30T21:47:51+5:302021-06-30T21:48:58+5:30

Medical Emergency Landing, Passenger dies of heart attack डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री ११.४६ वाजता दिल्ली-बेंगळूरू इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाची मेडिकल इमर्जन्सी लॅण्डिंग झाली.

Before night Medical Emergency Landing: Passenger dies of heart attack | उत्तररात्री विमानाची मेडिकल इमर्जन्सी लॅण्डिंग : हार्टअटॅकने प्रवाशाचा मृत्यू

उत्तररात्री विमानाची मेडिकल इमर्जन्सी लॅण्डिंग : हार्टअटॅकने प्रवाशाचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री ११.४६ वाजता दिल्ली-बेंगळूरू इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाची मेडिकल इमर्जन्सी लॅण्डिंग झाली. ६ई ६१७७ दिल्ली-बेंगळूरू फ्लाईटमध्ये प्रवासादरम्यान धरमपुर, गुरुग्राम निवासी ५७ वर्षीय प्रवासी राजेश निमानी यांना छातीत दुखणे भरले. सुचना मिळताच विमानतळावर मेडिकल सर्व्हिस देणाऱ्या एजेंसीने रुग्णाला रुग्णवाहिकेद्वारे मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेले. मेडिकलमध्ये डॉक्टरांनी तपासणीनंतर प्रवासी रुग्णाला मृत घोषित केले. प्रवासादरम्यान रुग्णासोबत त्यांचा मुलगा, नातीन व बहिण जावई होते. इमर्जन्सी लॅण्डिंगनंतर रात्री १२.५० वाजता फ्लाईट नागपुरातून बेंगळूरूकडे रवाना झाली. प्राप्त माहितीनुसार प्रवासी रुग्ण हे हृदयरोगी होती. उत्तम उपचारासाठी त्यांना बेंगळूरू येथे नेले जात होते.

Web Title: Before night Medical Emergency Landing: Passenger dies of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.