नागपूर विमानतळावर नाईट पार्किंग; नोव्हेंबरमध्ये सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:39 AM2018-09-10T11:39:02+5:302018-09-10T11:40:35+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोव्हेंबरमध्ये नाईट पार्किंग व्यवस्था सुरू होण्याची शक्यता असून इंडिगोची दोन विमाने विमानतळावर रात्री थांबणार आहेत.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोव्हेंबरमध्ये नाईट पार्किंग व्यवस्था सुरू होण्याची शक्यता असून इंडिगोची दोन विमाने विमानतळावर रात्री थांबणार आहेत. दोन्ही विमाने सकाळी ६ वाजता कोलकाता आणि बेंगळुरु येथे उड्डाण भरणार आहे.
नागपूर विमानतळावर उड्डाणासाठी अनुकूल वातावरण आणि अन्य विमानतळांच्या तुलनेत कमी वाहतूक असल्यामुळे कंपन्यांना त्याचा फायदा मिळतो. नागपूर विमानळावर कंपन्यांना विमानांसाठी रात्रीचे पार्किंग हवे असेल तर पहिल्या महिन्यात नि:शुल्क पार्किंग सेवा देण्यात येते. इंडिगो एअरलाईन्सच्या सूत्रांनी सांगितले की, नोव्हेंबरपासून कोलकाता व बेंगळुरुकडे जाणाऱ्या दोन विमानांना नागपुरात नाईट पार्किंग देण्यात येणार आहे. सकाळी दोन्ही शहरांसाठी विमाने रवाना होतील.
ग्राहकांना उत्तम कनेक्टिविटी आणि सर्वात प्रथम टायमिंग देण्याच्या स्पर्धेत कंपन्या ‘लो कॉस्ट करियर’च्या तयारी आहेत. नागपूर विमानतळावरून सर्वाधिक उड्डाण असणारी इंडिगो कंपनी उपराजधानीत रात्री सर्वाधिक विमाने पार्किंगमध्ये ठेवण्याची शक्यता आहे. सध्या दोन विमानांनी सुरुवात होणार आहे.
सध्या गो एअरलाईन्सचे एक विमान नागपुरात नाईट पार्किंगला आहे. हे विमान सकाळी ६ वाजता बेंगळुरुला रवाना होते. एअरलाईन्सच्या स्पर्धेचा सकारात्मक परिणाम उपराजधानीत हवाई प्रवाशांच्या संख्येवर दिसून येत आहे. मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) अहवालानुसार वित्तीय वर्ष २०१७-१८ मध्ये हवाई प्रवाशांची एकूण संख्या २१ लाख ७६ हजार ४३९ एवढी होती. त्या तुलनेत वित्तीय वर्ष २०१६-१७ मध्ये ही संख्या १८ लाख ३८ होती.
दोन तास प्रशिक्षण
नागपूर विमानतळावर रात्री कोणतीही फ्लाईट नसल्याचा फायदा इंडिगो एअरलाईन्स घेत आहे. शनिवारी रात्री १०.४५ वाजेपासून दोन तासांपर्यंत एअरलाईन्सच्या नवीन वैज्ञानिकांनी एटीआर विमानांच्या माध्यमातून लॅण्डिंग आणि टेकआॅफचे प्रशिक्षण घेतले.
हवामान अनुकूल व किफायत दर
नागपूरचे हवामान अन्य शहरांच्या तुलनेत विमानांच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. दुसरीकडे विमानतळांवर व्यस्ततेमुळे जागा मिळणे कठीण आहे. नागपूर विमानतळावर ही समस्या नाही.
- विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.