रात्रीला हाेत आहे तापमानात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:17+5:302020-12-05T04:14:17+5:30
नागपूर : शहरात रात्रीच्या तापमानात कमालीची घट हाेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासात किमान तापमानात ०.५ अंशाची ...
नागपूर : शहरात रात्रीच्या तापमानात कमालीची घट हाेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासात किमान तापमानात ०.५ अंशाची घट झाली असून ते १२.१ डिग्री सेल्सियस नाेंदविण्यात आले आहे. तापमान सामान्यपेक्षा दीड डिग्री खाली घसरल्याने हुडहुडी वाढली आहे. येणाऱ्या दिवसात तापमानात आणखी घट हाेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भात १०.६ अंशासह गाेंदियात सर्वात कमी तापमानाची नाेंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरण काेरडे हाेत गेल्याने तापमानात आणखी घसरण हाेइल. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात विक्रमी थंडी पडण्याचा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान अंदमान सागर, उत्तर प्रदेशमध्ये साइक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण हाेत असल्याने दक्षिण भारतातील काही राज्यात पाऊस पडत आहे.
नागपुरात दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा दाेन अंशाने अधिक आहे. २४ तासात कमाल तापमान ०.३ अंश वाढीसह ३२ डिग्री सेल्सियसवर पाेहचले. दिसवभर कडक ऊन पडल्याने थंडीचा प्रभाव जाणवला नाही. मात्र सूर्यास्त हाेताच तापमानात वेगाने घसरण झाली. त्यामुळे नागरिकांनी उनी कपड्यांसह शेकोट्यांचा आधार घेणे सुरू केले आहे.