ट्रॅव्हल्सची रातराणी जोरात, एसटी थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:38+5:302021-06-17T04:06:38+5:30
एसटीची रातराणी झालीच नाही सुरू नागपूर : अनलॉकनंतर प्रवासी गाड्या सुरु झाल्या आहेत. ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी रातराणी गाड्या सुरू केल्या ...
एसटीची रातराणी झालीच नाही सुरू
नागपूर : अनलॉकनंतर प्रवासी गाड्या सुरु झाल्या आहेत. ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी रातराणी गाड्या सुरू केल्या आहेत, परंतु एसटी महामंडळाने अद्याप रातराणी बस सुरु केल्या नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
एसटी महामंडळाच्या रातराणी बसला मोठा प्रतिसाद असतो. बहुतांश प्रवासी रात्रीच्या प्रवासाला पसंती देत असल्यामुळे एसटीच्या रातराणी बस फुल्ल होतात. परंतु प्रवासी नसल्याचे कारण सांगून अद्यापही एसटी महामंडळाने रातराणी बस सुरु केलेल्या नाहीत. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या रातराणीला प्रवासी चांगला प्रतिसाद देत आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाने त्वरित रातराणी बस सुरु करण्याची मागणी होत आहे.
..............
एसटी बसच्या सध्याच्या फेऱ्या : ७००
चालक : ९५०
वाहक : ८५०
रातराणी बसेस : ०
खासगी ट्रॅव्हल्सचे रातराणीचे दर
पुणे : १२६०
नाशिक : १२६०
औरंगाबाद : ८००
लातूर : ७००
सोलापूर : ९००
कोल्हापूर : १४००
जळगाव : ८००
धुळे : ९००
लवकरच रातराणी सुरु करु
‘अनलॉकनंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे प्रवासी रात्रीच्या बसने प्रवास करणे टाळत आहेत. सायंकाळी पाचनंतर बाहेर न पडण्याच्या नियमात शिथिलता आणल्यानंतर पूर्ण क्षमतेने रातराणी बस सुरु करण्यात येतील.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
..........