निकम गिट्टीखदानमध्ये, नंदनवार नियंत्रण कक्षात

By admin | Published: January 15, 2016 03:29 AM2016-01-15T03:29:41+5:302016-01-15T03:29:41+5:30

शहर पोलीस दलातील पाच पोलीस ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. यातील तीन ठाणेदारांना इकडून तिकडे फिरविण्यात आले तर, एकाला पदोन्नत करण्यात आले.

In the Nikam Giltkhand, in the Swanandar control room | निकम गिट्टीखदानमध्ये, नंदनवार नियंत्रण कक्षात

निकम गिट्टीखदानमध्ये, नंदनवार नियंत्रण कक्षात

Next

पाच ठाणेदारांच्या बदल्या : काही प्रतीक्षा यादीत
नागपूर : शहर पोलीस दलातील पाच पोलीस ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. यातील तीन ठाणेदारांना इकडून तिकडे फिरविण्यात आले तर, एकाला पदोन्नत करण्यात आले. विशेष म्हणजे, आणखी काही पोलीस निरीक्षकांच्या लवकरच बदल्या होणार असून, त्यांची प्रतीक्षा यादीही तयार असल्याचे समजते.
गेल्या आठवड्यात पाचपावली पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला लाच मागण्याच्या आरोपावरून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षकाने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातल्यात्यात या लाचप्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गावंडेसह ठाण्यातील तीन जणांची नावे आल्याने पाचपावली ठाण्यात भूकंप आला होता. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सायंकाळी ठाणेदार राजेंद्र दिनकरराव निकम यांची गिट्टीखदान ठाण्यात बदली करण्यात आली. गिट्टीखदानचे ठाणेदार अवधेश त्रिपाठी यांना नुकतीच पदोन्नती मिळाली. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेची जबाबदारी निकम यांना सोपविण्यात आली. नंदनवन ठाण्यातही एका उपनिरीक्षकाने एका निर्दोष तरुणाला धाक दाखवून लाच मागितली अन् पकडला गेला. या घटनेमुळे नंदनवन ठाण्यातील कारभारही वरिष्ठांना खटकला. त्यामुळे येथील ठाणेदार सुधीर पुंडलिकराव नंदनवार यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागेवर अजनीचे ठाणेदार सुनील दशरथ महाडिक यांची बदली करण्यात आली. गुन्हेगारांचे माहेरघर असलेले अजनी पोलीस ठाणे महाडिक यांनी पद्धतशीर हाताळले. त्याचमुळे त्यांना नंदनवनची जबाबदारी सोपविण्यात आली. तर, महाडिक यांच्या जागेवर अजनीतीलच द्वितीय निरीक्षक सांदीपान वसंतराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली. पवार यांना ठाणेदारकी बहाल करतानाच विशेष शाखेत असलेले पोलीस निरीक्षक अशोक श्रावण बागुल यांनाही जरीपटका पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली. तेथील ठाणेदार संजय सांगोळे यांची गडचिरोलीला बदली झाली आहे. जरीपटक्यातील अल्पवयीन भावंडाचे अपहरण, बलात्कार आणि हत्याकांड तसेच अन्य काही घटनांमुळे जरीपटक्याचा कारभारही वरिष्ठांसाठी मनस्तापाचा विषय ठरला होता. त्याचप्रमाणे नंदनवनचे द्वितीय निरीक्षक चंद्रशेखर मनोहर कदम यांना सक्करदरा येथे राठोड यांच्या रिक्त जागेवर नियुक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)

पाचपावली ठाणे रिक्त
विशेष म्हणजे, पाचपावलीच्या ठाणेदाराची बदली करण्यात आली तरी तेथे नवीन ठाणेदार कोण, ते स्पष्ट झाले नाही. त्याचप्रमाणे कोतवालीचे ठाणेदार सुरेश भोयर यांनाही पदोन्नती मिळाली. मात्र, बदलीच्या यादीत त्यांचे आज नाव आले नाही. आणखी काही ठाणेदारांबाबत एक-दोन दिवसात निर्णय होणार आहे.

Web Title: In the Nikam Giltkhand, in the Swanandar control room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.