नीलेश भरणे यांच्याकडे नागपूर शहर ‘सीपी’पदाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 08:06 PM2020-07-18T20:06:21+5:302020-07-18T20:07:46+5:30

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय सुटीवर गेल्यामुळे पोलीस आयुक्तपदाची तात्पुरती धुरा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्याकडे आली आहे.

Nilesh Bharane holds the post of Nagpur City CP | नीलेश भरणे यांच्याकडे नागपूर शहर ‘सीपी’पदाची धुरा

नीलेश भरणे यांच्याकडे नागपूर शहर ‘सीपी’पदाची धुरा

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय सुटीवर गेल्यामुळे पोलीस आयुक्तपदाची तात्पुरती धुरा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्याकडे आली आहे.
डॉ. भरणे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत. आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना उत्तराखंड केडर मिळाले. चार वर्षांपूर्वी ते प्रतिनियुक्तीवर नागपुरात पोलीस उपायुक्त म्हणून रुजू झाले होते. प्रारंभी त्यांना विशेष शाखा देण्यात आली. त्यानंतर परिमंडळ - ४ चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. तेथून त्यांची वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून बदली झाली. त्यांची धडाकेबाज कार्यशैली पाहून पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी दोन आठवड्यातच त्यांना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्त केले. येथून सहा महिन्यानंतर ते गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नत झाले.
दीड महिन्यापूर्वी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम निवृत्त झाले. तेव्हापासून प्रभारी सहपोलीस आयुक्त म्हणून डॉ. भरणे जबाबदारी सांभाळत आहेत. आता पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय चार दिवसाच्या सुटीवर गेल्यामुळे शहर पोलीस दलाच्या प्रमुख पदाची जबाबदारीही (प्रभारी म्हणून) त्यांच्याकडे आली आहे.

अधिकारी एक, जबाबदाऱ्या अनेक
गृहमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकाच अधिकाºयाला दोन दोन, तीन तीन पदांचा कार्यभार सांभाळावा लागत आहे.

Web Title: Nilesh Bharane holds the post of Nagpur City CP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.