नीलेशच निघाला ‘मास्टर मार्इंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:37 AM2017-09-11T01:37:21+5:302017-09-11T01:38:04+5:30

इंजिनियर तरुणी अंकिता खूनप्रकरणात आतापर्यंत झालेल्या पोलिसांच्या तपासात आरोपींना पकडून देण्यास मदत करणारा बिल्डर नीलेश खोब्रागडे हाच या खुनाचा ‘मास्टर मार्इंड’ निघाला.

Nilesh goes 'master-minded' | नीलेशच निघाला ‘मास्टर मार्इंड’

नीलेशच निघाला ‘मास्टर मार्इंड’

Next
ठळक मुद्देअंकिता कनोजिया खूनप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंजिनियर तरुणी अंकिता खूनप्रकरणात आतापर्यंत झालेल्या पोलिसांच्या तपासात आरोपींना पकडून देण्यास मदत करणारा बिल्डर नीलेश खोब्रागडे हाच या खुनाचा ‘मास्टर मार्इंड’ निघाला. आतापर्यंत स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करणाºया नीलेशबाबत लोकमतने संशय व्यक्त केला होता.
सूत्रानुसार ठरवलेल्या योजनेप्रमाणे ४ सप्टेंबर रोजी नीलेश आणि निखीलेश हे अंकिताला अक्षयच्या फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. अंकिताने आरडाओरड करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. भीतीने नीलेश तेथून पळाला. यानंतर निखीलेश व अक्षयने अंकिताचा गळा आवळून खून केला. मृतदेह कुठे लपवायचा याची त्यांना चिंता सतावू लागली. त्यांनी नीलेशला खुनाची माहिती दिली. त्याच्या मदतीनेच अंकिताचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून राज्याच्या सीमेबाहेर फेकण्याचा निर्णय घेतला. यासाठी एक नवीन सुटकेस खरेदी केली. यात मृतदेह ठेवून नीलेशसोबत कर्नाटकच्या सीमेकडे रवाना झाले. अंकिताचा खून झाल्यानंतर नीलेशने निखीलेश व अक्षयला ‘प्लॅन’ समजावून सांगितला. त्याने पोलीस प्रशासनात आपली ओळख असल्याचे सांगून या खुनात माझा काही सहभाग नाही, असे पोलिसांना सांगण्यास निखीलेश व अक्षयला सांगितले. ‘मी बाहेर राहिल्यास तुम्हा दोघांना बाहेर आणू शकतो, असा विश्वास त्यांना नीलेशने दाखवला. त्यांना जामीन मिळवून देण्यास व निर्दोष सोडवण्यासाठी सुद्धा तो मदत करेल, असेही सांगितले. निखीलेश हा नीलेशकडेच काम करीत होता. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्याच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला. अक्षय हार्डवेयर आणि निखीलेश आयटी इंजिनियर आहे. नीलेश बिल्डर आहे. ठाणे पोलिसांनी तिघांनाही १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. पोलिसांनी रविवारी आरोपीने सांगितल्यानुसार पूर्ण घटनाक्रमाची रिहर्सल केली. अंबरनाथ येथील ज्या दुकानातून सुटकेस खरेदी केली त्या दुकानदाराचे बयाण सुद्धा नोंदविण्यात आले.

महाग पडला विश्वास
अंकिता ही हुशार तरुणी होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील अंकिताने जीवनात यशस्वी होण्यासाठी घराबाहेर पाऊल ठेवले. तिची निखीलेश सोबत केवळ सहा महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. तिला निखीलेशबाबत फार काही माहितीही नव्हती. मैत्री असल्याने त्याच्यासोबत फिरायला गेली. परंतु त्याच्या मनात काय आहे, हे ती ओळखू शकली नाही.

Web Title: Nilesh goes 'master-minded'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.