मनपाचे नऊ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:11 AM2020-07-25T00:11:06+5:302020-07-25T00:13:09+5:30

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या शेडला आकस्मिक भेट दिली. यात काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. अशा नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.

Nine employees of the corporation suspended | मनपाचे नऊ कर्मचारी निलंबित

मनपाचे नऊ कर्मचारी निलंबित

googlenewsNext
ठळक मुद्देआयुक्त मुंढे सकाळी ६ वाजताच धडकले : प्रथम सीओसीमधून ट्रेसिंग नंतर प्रत्यक्ष स्थळी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या शेडला आकस्मिक भेट दिली. यात काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. अशा नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.
आयुक्त तुकाराम मुंढे सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालयात पोहोचले. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष २४ तास सुरू असतो. येथे कर्मचाऱ्यांना पाळीमध्ये बोलाविण्यात येते. मात्र रात्रपाळीत असलेले चार कर्मचारी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडत नसल्याचे निदर्शनास आले. कर्तव्यात कसूर केलेल्या किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांना तात्काळ प्रभावाने आयुक्तांनी निलंबित केले.
यानंतर मनपा आयुक्त यांनी अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. तेथून शहरात प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची पाहणी केली. सर्व सफाई कामगारांना घड्याळी देण्यात आल्या आहेत. त्यावरून प्रत्येक कर्मचारी कुठे आहे, त्याचे ट्रॅकिंग केले जाते. मनपा आयुक्तांनी अचानकपणे विविध झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना फोन लावून उलटतपासणी केली. कोण कुठे आहेत, ते लोकेशन तपासले. यानंतर तेथून पाचपावली, इंदोरा, धरमपेठ अशा काही ठिकाणी हजेरी शेडला भेट दिली. तेथील हजेरी रजिस्टरची तपासणी केली. तेथेही काही स्वच्छता निरीक्षक व अन्य कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. त्यांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेत. यामध्ये आशीनगर झोन क्रमांक ९ चे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोन क्रमांक ५ चे राजेंद्र सोनटक्के आणि मंगळवारी झोन क्रमांक १० चे दिनेश करोसिया यांचा समावेश आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या आकस्मिक पाहणी दौºयात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

Web Title: Nine employees of the corporation suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.