नागपुरात व्यावसायिकाची नऊ लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 09:21 PM2019-10-17T21:21:43+5:302019-10-17T21:23:01+5:30

खरडा व्यावसायिकाची नऊ लाखांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने कारमधून पळवून नेली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एचडीएफसी बँकेच्याजवळ बुधवारी भरदुपारी ही घटना घडली.

Nine lakh cash stolen of businessman in Nagpur | नागपुरात व्यावसायिकाची नऊ लाखांची रोकड लंपास

नागपुरात व्यावसायिकाची नऊ लाखांची रोकड लंपास

Next
ठळक मुद्देएचडीएफसी बँकेजवळ घडली घटना : अंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरडा व्यावसायिकाची नऊ लाखांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने कारमधून पळवून नेली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एचडीएफसी बँकेच्याजवळ बुधवारी भरदुपारी ही घटना घडली. मनीष तरसेमकुमार बंसल (वय ४२) असे तक्रारदार व्यावसायिकाचे नाव आहे.
बंसल रचना साईतारा, गिट्टीखदानमध्ये राहतात. त्यांची खरडा (कार्टून) बनविण्याची कंपनी आहे. कंपनीत काम करणाऱ्यांचे पगार आणि दिवाळी बोनस देण्यासाठी म्हणून त्यांनी बुधवारी दुपारी ३. ४० च्या सुमारास एचडीएफडी बँकेतून नऊ लाखांची रोकड काढली. ही रक्कम त्यांनी एका बॅगमध्ये भरून ती बॅग आपल्या कारच्या ड्रायव्हिंग सिटच्या बाजूच्या सीटवर ठेवली. त्यानंतर ते आपला लॅपटॉप दुरुस्त करण्यासाठी शंकरनगर चौकाजवळच्या एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात गेले. तेथे त्यांच्या कंपनीच्या भागीदाराचा फोन आला. बँकेतून सही मिस मॅच झाल्याचा फोन आला आणि बँक अधिकाऱ्याने तातडीने तुम्हाला बँकेत बोलविले, असा निरोप रितेश जैन नामक भागीदाराने दिल्यामुळे बंसल पुन्हा बँकेत पोहचले. त्यांनी आपली कार बँकेच्या बाजूला लावली आणि रोकड असलेली बॅग घाईगडबडीत कारमध्येच ठेवून ते आत गेले. काही वेळेनंतर ते परत आले तेव्हा त्यांना कार (एमएच ३१/ ईयू ३७२०) मध्ये ठेवलेली बॅग आढळली नाही. चोरट्याने कारच्या दाराची कांच तोडून बॅग लंपास केली होती. बंसल यांनी लगेच आपल्या भागीदाराला फोन करून बँकेत बोलवून घेतले. त्यानंतर अंबाझरी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. रोकड चोरणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजचा आधार
या धाडसी चोरीचा शोध लावण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीचा एकमात्र आधार आहे. त्या आधारे पोलीस चोरट्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, चोरटा बंसल यांनी बँकेतून रोकड काढल्यापासून त्यांच्या मागावर असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

Web Title: Nine lakh cash stolen of businessman in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.