पिंपळाच्या झाडावर वीज काेसळल्याने नऊ माकडांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 08:51 PM2022-08-04T20:51:43+5:302022-08-04T20:52:23+5:30
Nagpur News सावनेर तालुक्यातील वलनी (ता. सावनेर) शिवारात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी वीज काेसळल्याची घटना गुरुवारी (दि. ४) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. यात नऊ माकडांचा मृत्यू झाला
नागपूर : सावनेर तालुक्यातील वलनी (ता. सावनेर) शिवारात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी वीज काेसळल्याची घटना गुरुवारी (दि. ४) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. यात नऊ माकडांचा मृत्यू झाला तर एका मंदिरातील विद्युत साहित्य जळाले.
खापरखेडा परिसरात गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, वलनी वस्तीजवळच्या कन्हान नदीकाठावरील माकडांचा कळप असलेल्या पिंपळाच्या झाडावर वीज काेसळली. त्यात झाडावरील नऊ माकडांचा हाेरपळून मृत्यू झाला. गावातील नंदकिशाेर आंबिलडुके हा घटनास्थळी पाेहाेचला असता, त्याला झाडाखाली मृत माकडे दिसून आली.
याबाबत त्याने वलनी ग्रामपंचायत, वनविभागाला सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव प्रेमी दादू गणवीर, जि. प. सदस्य प्रकाश खापरे घटनास्थळी पाेहाेचले. वनविभागाचे आश्विन काकडे, रेखा चोंदे, अनिल राठोड, पाेलीस उपनिरीक्षक नामदेव धांडे, शिपाई सदानंद नारनवरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान वन अधिकारी व पाेलिसांनी जेसीबी बाेलावून मृत माकडांना जमिनीत पुरण्यात आले. दुसऱ्या घटनेत वलनी वस्तीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कळसावर वीज काेसळल्याने तेथील विद्युत साहित्य जळाले. या घटनेबाबत सावनेरचे तहसीलदार व तलाठी यांना माहिती देण्यात आली. परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडाट सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण दिसून आले.