नऊ महिन्यांपासून अडल्या फाईल्स
By admin | Published: December 29, 2015 08:03 PM2015-12-29T20:03:05+5:302015-12-29T20:03:05+5:30
गेल्या नऊ महिन्याांसून विकास कामांच्या ‘निश्चित प्राधान्या’च्या(फिक्स प्रायवोरिटी)फाईल्स महापालिकेत मंजुरीसाठी अडल्या आहेत. ‘निश्चित प्राधान्याची विकास कामे त्वरित करणे अत्यावश्यक असते.
नागपूर : गेल्या नऊ महिन्याांसून विकास कामांच्या ‘निश्चित प्राधान्या’च्या(फिक्स प्रायवोरिटी)फाईल्स महापालिकेत मंजुरीसाठी अडल्या आहेत. ‘निश्चित प्राधान्याची विकास कामे त्वरित करणे अत्यावश्यक असते. नगरसेवकांच्या सूचनेनुसार या कामांना मंजुरी दिली जाते. यासाठी प्रत्येक वॉर्डाला १५ लाख रुपयांपर्यंतचा फंड दिला जातो.
या फाईल्स अडल्यामुळे विरोधकांसोबतच सत्तापक्षातीलही नगरसेवक नाराज असून, त्यांनी महापौर प्रवीण दटके व स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्याकडे तक्रार केली आहे. स्थायी समितीच्या सदस्यांनी हा मुद्दा सोमवारी बैठकीत उपस्थित केला.
यावर स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी अपर आयुक्त नयना गुंडे यांना याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले. तसेच संबंधित फाईल्स का अडल्या, याची माहितीही सादर करण्याचे निर्देश दिले. सिंगारे म्हणाले, प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून महापालिकेचे काम चालते. जनतेशी संबंधित प्रश्न एकत्रितरीत्या सोडविले जातात. निश्चित प्राधान्याच्या फाईलवर नगरसेवकांचा अधिकार असतो. त्यामुळे त्या फाईल्स मंजूर न करता अडवून ठेवणे योग्य नाही. यावर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)