पहिल्यांदाच कोरोनाचे नऊ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:44+5:302021-07-20T04:07:44+5:30
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेत धडकी भरवणारा ग्राफ दिसून आला असताना तोच आता दिवसेंदिवस घसरतो आहे. सोमवारी पहिल्यांदाच ९ ...
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेत धडकी भरवणारा ग्राफ दिसून आला असताना तोच आता दिवसेंदिवस घसरतो आहे. सोमवारी पहिल्यांदाच ९ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ४, ग्रामीणमधील १, तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,७७१ झाली असून, मागील तीन दिवसांपासून मृतांची संख्या १०,११५वर स्थिर आहे.
जानेवारी महिन्यानंतर सर्वात कमी चाचण्यांची नोंद सोमवारी झाली. ३४३४ तपासण्या झाल्या. यातून केवळ ०.२६ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, शहरात ३१९०, तर ग्रामीणमध्ये केवळ २४४ संशयित रुग्णांच्या तपासण्या झाल्या. शहरात आतापर्यंत २३,२१,५९३ तपासण्यांमधून ३,३९,९१० तर, ग्रामीणमध्ये ८,८५,१०१ तपासण्यांमधून १,४६,०६१ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची एकूण संख्या ६८०० झाली असून १६२१ मृत्यू झाले आहेत. सध्या कोरोनाचे ३९४ रुग्ण सक्रिय आहेत. यातील ८१ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात, तर २२३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आज १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
-९९.७३ टक्के चाचण्या निगेटिव्ह
सोमवारी झालेल्या ३,४३४ चाचण्यातून ९९.७३ टक्के म्हणजे ३,४२५ चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. विशेष म्हणजे, मेयोमध्ये ३९५, नीरीमध्ये ३७, तर नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ५२९ चाचण्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही. एम्समध्ये ५२८ तपासणीतून १, मेडिकलमध्ये १४१ तपासणीतून १ तर, खासगीमध्ये ११८९ तपासणीतून ७ रुग्ण आढळून आले आहेत.
:: कोरोनाची सोमवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ३४३४
शहर : ४ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९२,७७१
ए. सक्रिय रुग्ण : ३०४
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,३५३
ए. मृत्यू : १०,११५