१०० नवजात बालकांमधून नऊ सिकलसेल वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:14 PM2019-03-04T12:14:55+5:302019-03-04T12:15:26+5:30

सिकलसेल असोसिएन नागपूरतर्फे (स्कॅन) आतापर्यंत ७० हजार लोकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. यातील ५० नवजात बालकांच्या तपासणीत नऊ बालके सिकलसेल वाहक आढळून आली आहेत.

Nine sickle carriers from 100 newborns | १०० नवजात बालकांमधून नऊ सिकलसेल वाहक

१०० नवजात बालकांमधून नऊ सिकलसेल वाहक

Next
ठळक मुद्देसिकलसेल असोसिएशन नागपूरतर्फे ‘सिकलसेल सप्ताह’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिकलसेल असोसिएन नागपूरतर्फे (स्कॅन) आतापर्यंत ७० हजार लोकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. यातील ५० नवजात बालकांच्या तपासणीत नऊ बालके सिकलसेल वाहक आढळून आली आहेत. ‘सिकलसेल सप्ताह’अंतर्गत पाचपावलीतील सूतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, महाल, सदरच्या महापालिकांच्या रुग्णालयांसह मातृ सेवा संघाच्या बर्डी व महालच्या रुग्णालयात नि:शुल्क तपासणी शिबिर घेण्यात येईल, अशी माहिती मेयोच्या माजी अधिष्ठाता व ‘स्कॅन‘च्या अध्यक्ष डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यावेळी आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. वीरल कामदार, मेडिकलच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीखंडे म्हणाल्या, सिकलसेल रुग्णांचा कौटुंबिक बौद्धिकस्तर व अंधश्रद्धेचा पगडा व हलाखीची आर्थिक स्थिती यामुळे आजही या आजाराविषयी त्यांना माहिती नाही. नागपूरसह विदर्भात सिकलसेलचे मोठ्या संख्येत रुग्ण आढळून येतात. यातच सिकलसेल घेऊन जन्माला आलेल्या मुलांकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. हे जीव वाचविण्यासाठी रुग्णांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी करून त्यानुसार त्यावर उपचाराची दिशा निश्चित होणे गरजेचे आहे. उपराजधानीतील रुग्णांवर अचूक उपचारासाठी सिकलसेल सोसायटीने पथदर्शी प्रयोग सुरू केला आहे. यात अशा आई-वडिलांना शोधून काढून त्यांच्या अपत्यांना उपचाराखाली आणले जात आहे. यासाठी काही सामाजिक संस्था व समाजसेवक आपला वेळ व धनाचीही मदत
करीत आहे.

दुर्गम भागातील युवकांना सिकलसेल तपासणी प्रशिक्षण
डॉ. कोठे कुटुंबीयांकडून दंतेवाडा येथे आदिवासी प्रकल्प चालविला जातो. या भागातील बारावी पास मुलांना सिकलसेल तपासणीचे प्रशिक्षण दिले जाते. यावर्षी सहा मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. हे युवक दुर्गम भागातील लोकांची तपासणी करतात. रुग्ण आढळून आल्यास त्याला उपचाराखाली आणतात.

दुर्गम भागात चाचणीला प्रतिसाद
लग्नापूर्वी सिकलसेल चाचणी करून त्यानुसार विवाह केल्यास सिकलसेल भविष्यात नियंत्रित होऊ शकतो. ‘एएस-एएस’ पॅटर्नच्या व्यक्तींनी लग्न टाळावे, अशी जनजागृती केली जात असल्याने दुर्गम भागातही १०० मधून साधारण ४० ते ५० लोक सिकलसेल चाचणी करण्यासाठी समोर येत असल्याचे डॉ. कोठे यांनी सांगितले.

Web Title: Nine sickle carriers from 100 newborns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य