‘नीरी’ने दिली, ‘मनपा’ने डुबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:53 AM2018-04-08T00:53:48+5:302018-04-08T00:54:00+5:30

शहरातील तलावांवर तरंगणाऱ्या कचऱ्याची अगदी सहजपणे सफाई व्हावी, या हेतूने ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे पुढाकार घेण्यात आला. ‘नीरी’च्या संशोधकांनी कल्पनाशक्ती व मेहनतीने अवघ्या काही कालावधीत ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भ’ यांच्या सहकार्याने यासाठी ‘फ्लोटिंग सायकल’ तयार करण्यात आली. ‘नीरी’कडून ‘मनपा’ला ही ‘सायकल’ सोपविण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. चक्क काही अल्पवयीन मुलांनी सायकलवर सैर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यासह ‘सायकल’ उलटली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी मनपा प्रशासनाची उदासीनता मात्र दिसून आली आहे.

'NIRI' gave it and 'NMC' dipped it | ‘नीरी’ने दिली, ‘मनपा’ने डुबविली

‘नीरी’ने दिली, ‘मनपा’ने डुबविली

googlenewsNext
ठळक मुद्दे‘फ्लोटिंग सायकल’बाबत अशीही उदासीनताकधी बदलणार प्रशासनाची मानसिकता?-तर होऊ शकला असता मोठा अपघात

 







लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील तलावांवर तरंगणाऱ्या कचऱ्याची अगदी सहजपणे सफाई व्हावी, या हेतूने ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे पुढाकार घेण्यात आला. ‘नीरी’च्या संशोधकांनी कल्पनाशक्ती व मेहनतीने अवघ्या काही कालावधीत ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भ’ यांच्या सहकार्याने यासाठी ‘फ्लोटिंग सायकल’ तयार करण्यात आली. ‘नीरी’कडून ‘मनपा’ला ही ‘सायकल’ सोपविण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. चक्क काही अल्पवयीन मुलांनी सायकलवर सैर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यासह ‘सायकल’ उलटली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी मनपा प्रशासनाची उदासीनता मात्र दिसून आली आहे.
तलावांवर तरंगणारा कचरा व विविध वस्तूंचे अवशेष ही पर्यावरण संवर्धनासाठी डोकेदुखीच बनली आहे. हा कचरा काढायला अनेकदा द्राविडीप्राणायमदेखील करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन ‘नीरी’ने पर्यावरण प्रेरणा विदर्भ यांच्या सहकार्याने ‘फ्लोटिंग सायकल’ची निर्मिती केली आहे. ‘इकोफ्रेंडली’ असलेल्या या ‘सायकल’मुळे एकाच वेळी तलावाची सैर व स्वच्छता शक्य होऊ शकणार आहे. या ‘प्रोपेलर’मुळे तलावांमध्ये वायुमिश्रणदेखील होते व यामुळे पाण्यामधील प्राणवायूचे प्रमाण वाढायला मदत होते. या प्रक्रियेमुळे तलावाच्या पाण्यात स्व-शुद्धीकरणाची प्रक्रिया होते. या ‘फ्लोटिंग सायकल’मध्ये सुरक्षेचीदेखील तजवीज करण्यात आली असून ‘पीव्हीसी पाईप्स’चा उपयोग करण्यात आला आहे. कचरा गोळा करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
फुटाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी ‘नीरी’तर्फे ही सायकल मनपाला सोपविण्यात आली.
‘नीरी’चे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी मनपाचे आयुक्त अश्विन मुद्गल यांना सकाळी ९.३० च्या सुमारास ही ‘फ्लोटिंग सायकल’ सोपविली. यावेळी मनपाचे इतर अधिकारीदेखील उपस्थित होते. ही ‘सायकल’ पाहण्यासाठी नागरिकांचीदेखील मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम झाल्यानंतर मनपातर्फे ‘सायकल’ची सुरक्षा अपेक्षित होती. प्रत्यक्षात ‘फ्लोटिंग सायकल’वर जास्तीत जास्त दोन जण उभे राहू शकतात. मात्र एकाच वेळी चार ते पाच अल्पवयीन मुलांनी ‘सायकल’वर चढण्याचा प्रयत्न केला. यात ‘सायकल’सह मुले पाण्यात पडली. यातील एका मुलाने ‘लाईफ जॅकेट’ घातले होते. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. परंतु संशोधकांनी मेहनतीने तयार केलेल्या गोष्टीबाबत मनपा प्रशासन किती गंभीर आहे, असा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला.
...तर काय झाले असते ?
‘फ्लोटिंग सायकल’ची क्षमता ही एक किंवा जास्तीत जास्त दोन व्यक्तींची आहे. प्रत्येकाला ‘लाईफ जॅकेट’ घालणे अनिवार्य आहे, अशी सूचनादेखील ‘नीरी’च्या संशोधकांनी केली होती. मात्र मनपाने ही सूचनाच गंभीरतेने घेतली नाही. जर ही ‘सायकल’ किनाºयापासून दूर उलटली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. ‘नीरी’च्या संचालक संशोधन सेलच्या प्रमुख डॉ.आत्या कपले यांना संपर्क केला असता, आमच्यासमोर अशी घटना घडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु आम्ही निघून गेल्यावर काही ‘टीनएजर्स’ एकत्र ‘सायकल’वर चढले. साहजिकच ‘सायकल’ उलटली. यासंदर्भात मनपाचे अधिकारीच जास्त सांगू शकतील, असे त्यांनी सांगितले. मनपाचे आयुक्त अश्विन मुद्गल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
‘इकोफ्रेंडली’ आहे ‘फ्लोटिंग सायकल’
तलावांची सहजपणे स्वच्छता व्हावी या उद्देशातून ‘फ्लोटिंग सायकल’चे ‘डिझाईन’ तयार करण्यात आले आहे. या ‘सायकल’मध्ये ‘प्रोपेलर’देखील असून ‘हॅन्डल’ने दिशा देता येणे शक्य आहे.या ‘सायकल’मध्ये कुठेही इंधनाचा वापर होत नसल्यामुळे तलावाचे प्रदूषण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ‘नीरी’तील संशोधकांनी सांगितले आहे.

 

Web Title: 'NIRI' gave it and 'NMC' dipped it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.