पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेप
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 3, 2024 14:06 IST2024-06-03T14:05:16+5:302024-06-03T14:06:30+5:30
Nagpur : सत्र न्यायालयाने दिला बहुप्रतिक्षित निर्णय

Nishant Agarwal, a spy for Pakistan, gets life imprisonment
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाने हा बहुप्रतिक्षित निर्णय दिला.
निशांत ब्रह्मोस एरोस्पेसच्या नागपूर शाखेत अभियंता होता. तो एका महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. त्यातून तो त्या महिलेला गोपनीय माहिती पुरवित होता. ती माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचत होती. नागपूरजवळच्या मोहगाव येथे डीआरडीओचा ब्रह्मोस मिसाईल प्रकल्प आहे. हा प्रकल्प भारत व रशियाच्या संयुक्त तंत्रज्ञानावर आधारित आहे. निशांतला उत्तर प्रदेश एटीएसने ८ आक्टोबर २०१८ रोजी नागपूर येथून अटक केली होती. त्यानंतर त्याच्या संगणकात गोपनीय माहिती आढळून आली होती.