नागपुरातील अनधिकृत सेलिब्रेशन हॉलवर नासुप्रचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:06 AM2018-05-04T00:06:56+5:302018-05-04T00:07:15+5:30

मानेवाडा रोडवरील लाडीकर ले-आऊ ट येथील दोन मजली आलिशान श्रीराम सेलिब्रेशन हॉलचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हॉलच्या अवैध पार्किंगमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. यासंदर्भात महापालिका व नासुप्रकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुुरुवारी सेलिबे्रशन हॉलचे जीसीबीच्या साह्याने काही बांधकाम तोडण्यात आले. शुक्रवारी उर्वरित बांधकाम हटविण्यात येणार आहे.

NIT hammer on the Illegal celebration hall in Nagpur | नागपुरातील अनधिकृत सेलिब्रेशन हॉलवर नासुप्रचा हातोडा

नागपुरातील अनधिकृत सेलिब्रेशन हॉलवर नासुप्रचा हातोडा

Next
ठळक मुद्देपरवानगी न घेता दोन मजली बांधकाम : अवैध पार्किंग विरोधात होती नागरिकांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानेवाडा रोडवरील लाडीकर ले-आऊ ट येथील दोन मजली आलिशान श्रीराम सेलिब्रेशन हॉलचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हॉलच्या अवैध पार्किंगमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. यासंदर्भात महापालिका व नासुप्रकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुुरुवारी सेलिबे्रशन हॉलचे जीसीबीच्या साह्याने काही बांधकाम तोडण्यात आले. शुक्रवारी उर्वरित बांधकाम हटविण्यात येणार आहे.
हॉलचे मालक विलास लाडीकर यांनी नासुप्रची परवानगी न घेता दोन मजली इमारतीचे बांधकाम केले होते. येथे पार्किंगची व्यवस्था नसल्याने आयोजित कार्यक्रमासाठी येणाऱ्यांची वाहने परिसरात तसेच आजूबाजूच्या नागरिकांच्या घरापुढे पार्किंग केली जात होती. यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अनेकदा वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंग विरोधात कारवाई केली. त्यानंतरही हॉल मालकांनी पार्किंगसाठी पर्यायी जागेची व्यवस्था केली नव्हती. अखेर त्रस्त नागरिकांनी नगरसेवक दीपक चौधरी यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडे तक्रार के ली होती. तसेच नगरसेविका रूपाली ठाकूर यांच्या नेतृत्वातील
शिष्टमंडळातर्फे नासुप्रचे माजी सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांना तसेच पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. तक्रारीनुसार नासुप्रने १६ मार्च २०१८ रोजी लाडीकर यांना नोटीस बजावून अनधिकृत बांधकाम हटविण्याचे निर्देश दिले होते. परंतु लाडीकर यांनी अनधिकृत बांधकाम हटविले नाही तसेच त्यांनी अधिकृत बांधकाम नियमित करण्यासंदर्भात नासुप्रकडे अर्ज केला नाही. त्यामुळे गुरुवारी नासुप्रचे विभागीय अधिकारी अविनाश बडगे, संजय चिमूरकर यांच्या नेतृत्वातील पथकाने पोलीस बंदोबस्तात पथक प्रमुख मनोहर पाटील यांनी ही कारवाई केली.
हॉल मालकाने पार्किंगची व्यवस्था केली असती तर आमची तक्रार नव्हती. परंतु अनेकदा तक्रार करूनही याची दखल घेतली नाही. हॉलमध्ये सकाळ, संध्याकाळ कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत डीजे वाजत होते तसेच त्यानंतर सामानाची वाहतूक केली जात होती. या गोंधळामुळे नागरिक त्रस्त होते.
नागरिकांनी केले होते आंदोलन
सेलिब्रेशन हॉलच्या अवैध पार्किग व ध्वनी प्रदूषणासंदर्भात परिसरातील नागरिकांनी महापालिका, नासुप्र व वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतरही कारवाई न केल्याने २३ मार्चला नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते परशू ठाकूर यांच्या नेतृत्वात येथे आंदोलन केले होते. त्यानंतर नासुप्र प्रशासनाने याची दखल घेतली.

Web Title: NIT hammer on the Illegal celebration hall in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.