नासुप्र मुख्यालय ठरले हॉटस्पॉट :  २६ कर्मचारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 12:12 AM2021-03-18T00:12:24+5:302021-03-18T00:13:35+5:30

NIT headquarters hotspot नागपूर सुधार प्रन्यास मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. बुधवारी ११ कर्मचारी पॉझिटिव्ह आले. मागील चार दिवसात २६ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने नासुप्र कार्यालय कोरोना हॉटस्पॉट ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

NIT headquarters becomes hotspot: 26 employees positive | नासुप्र मुख्यालय ठरले हॉटस्पॉट :  २६ कर्मचारी पॉझिटिव्ह

नासुप्र मुख्यालय ठरले हॉटस्पॉट :  २६ कर्मचारी पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. बुधवारी ११ कर्मचारी पॉझिटिव्ह आले. मागील चार दिवसात २६ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने नासुप्र कार्यालय कोरोना हॉटस्पॉट ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या टेबलांचे सुरक्षित अंतर नसल्याने व नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याने कर्मचारी पॉझिटिव्ह येत असल्याची माहिती आहे.

नासुप्र कार्यालयात ३०० ते ३५० कर्मचारी व अधिकारी आहेत. मंगळवारी ९४ कर्मचाऱ्यांची तर बुधवारी ५४ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. उर्वरित कर्मचाऱ्यांचीही चाचणी केली जाणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. काही विभागात कर्मचाऱ्यांचे टेबल एकमेकाला लागून आहेत. सुरक्षित अंतर नसल्याने संसर्ग वाढण्याचा धोका आहे. येथे बायोमेट्रिक पद्धतीने कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविली जाते. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. संक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: NIT headquarters becomes hotspot: 26 employees positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.