‘एनआयटी’ भरतीमध्ये आघाडीवर
By admin | Published: July 21, 2016 02:00 AM2016-07-21T02:00:10+5:302016-07-21T02:00:10+5:30
एनआयटी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनमध्ये विद्यार्थ्यांना सर्वंकष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन कॅम्पस मुलाखतीसाठी
एकूण ८१८ विद्यार्थ्यांची निवड : नामांकित कंपन्यांची कॉलेजला भेट
नागपूर : एनआयटी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनमध्ये विद्यार्थ्यांना सर्वंकष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन कॅम्पस मुलाखतीसाठी तयार करण्यात येते. २०१५-१६ च्या सत्रात इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना नोकरी प्रदान करण्यासाठी नामांकित कंपन्यांनी एनआयटीला भेट देऊन मुलाखती घेतल्या.
कॉलेजच्या विविध मोहिमेत एकूण १५ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून, त्यापैकी ८१८ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. गेल्या सत्रात ७३ कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. त्यात एनआयटीच्या १७१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात कॉलेजच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. अनिल तिजारे यांची मोलाची भूमिका आहे. भरतीसाठी एनआयटीच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. राजेश चौकसे आणि पॉलिटेक्निक टीपीओ विभागप्रमुख प्रा. प्रशांत रहाटे यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि समन्वयक चमू कार्यरत आहे.
विंड वर्ल्ड इंडिया लि., महिन्द्र अॅण्ड महिन्द्र, ताल मॅन्युफॅक्चरिंग लि., व्हिडिओकॉन, वेरॉक इंजिनीअरिंग, सिएट टायर, व्होल्टाज लि., धूत ट्रान्समिशन, प्रॉडक्शन मॉडेलिंग इंडिया, बजाज इलेक्ट्रिकल्स, भारत फोर्ज, एनझिग्मा, यालामचिली, विप्रो, वेबडायरेक्ट, टुपिड टेक्नॉलॉजिस, क्वॉलिटी किओसक, एजीएस ट्रान्सअॅक्ट, टीसीएस इयॉन, फिक्शन टू फॅक्ट, कॉमसॉफ्ट टेक्नॉलॉजिस, क्यूईडी एम्बेडेड सर्व्हिसेस, फ्लार्इंग पेग्वीन, रिएचो, सुदेशी, इन्पायर, रोथे इडर, सुनील हायटेक, शारदा इस्पात, एचयूएफ इंडिया लि., अॅसेंट बिझनेस सोल्युशन, ग्रेस एड्युनेट, आय-सर्व्हे कम्युनिकेशन आदींसह अनेक कंपन्यांनी कॉलेजला भेटी दिल्या आहेत.
इन्स्टिट्यूशन आणि इंडस्ट्रीमधील अंतर दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी वैयक्तिक मुलाखत, समूह चर्चा, वेळेचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य आदींसह विविध विषयांवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन आणि जीआरई, जीमॅट, कॅट, गेट, टोफेल आदी स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देण्यात येते. एनआयटीचे विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, आॅस्ट्रेलिया तसेच आयआयटी खरगपूर, आयआयटी पवई आणि आयआयएम शिलाँग येथे एमएस व एमबीएचे शिक्षण घेत आहेत. पवन सहारेला गेट-२०१६ मध्ये अ.भा.स्तरावर ७२९ वे स्थान मिळाले आहे. एनआयटीचे प्र्राचार्य डॉ. सुरेंद्र गोळे, एनआयटी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. जी.एफ. पोटभरे आणि व्यवस्थापनाने चमू आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. (वा.प्र.)