नागपुरातील विकास प्रकल्पांमध्ये १ लाख १३ हजार तरुणांना रोजगार, गडकरींचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 10:54 AM2022-03-26T10:54:05+5:302022-03-26T17:09:54+5:30
फॉर्च्युन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित युथ एम्पॉवरमेन्ट समिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान, मेट्रो प्रकल्प, एमआयडीसीसह विविध विकास प्रकल्पांमुळे मागील काही वर्षांपासून नागपुरात रोजगारनिर्मितीचा वेग वाढला. विदर्भातील १ लाख १३ हजार तरुणांना या प्रकल्पांमुळे रोजगार मिळाला असल्याचा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला.
फॉर्च्युन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित युथ एम्पॉवरमेन्ट समिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला माजी खासदार अजय संचेती, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार आणि युथ एम्पाॅवरमेंट समिटचे संयोजक अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते.
गरीबी व बेरोजगारी या आपल्या देशासमोरील सर्वांत मोठ्या समस्या आहेत. बेरोजगारीमुळे जास्त समस्या वाढतात. त्यामुळे तरुणांना आत्मनिर्भर करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.