Nitin Gadkari: महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकणारच; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 01:05 PM2022-03-17T13:05:31+5:302022-03-17T13:06:32+5:30

भाजपानं सबका साथ, सबका विश्वास बोलण्यापुरतं नव्हे तर कृतीतून मांडले आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणला नवी दिशा मिळाली आहे असं नितीन गडकरींनी सांगितले.

Nitin Gadkari: One Day BJP in Power in Maharashtra; Union Minister Nitin Gadkari's claim | Nitin Gadkari: महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकणारच; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

Nitin Gadkari: महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकणारच; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

Next

नागपूर – ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. भाजपासाठी या निवडणुका कठीण जाणार असं अनेकजण म्हणत होते. गोव्यात भाजपाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीही उतरले होते. परंतु गोव्याच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. ५ राज्याच्या निवडणुकीच्या निकालाचं वैशिष्ट म्हणजे जात, पात धर्म, भाषा यात न पडता भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान केले. गोव्याचा विजय इथेच हे थांबणार नसून एकदिवस महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) म्हणाले की, देशातील जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपाचा पाया मजबूत करण्याचं काम केले. जात, पात धर्म, भाषा यापेक्षा लोकं भविष्याकरता आणि विकासाला मतदान करतात हे लोकांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे जातीयवाद आपण नष्ट केलं आहे. जातीयवाद नष्ट करून विकासाच्या मुद्द्यावर गाव, शेतकरी गरिबांना मुलभूत सुविधा कशा देता येतील? आत्मनिर्भर भारत बनवण्याचं स्वप्न मोदींनी उराशी बाळगलं आहे. सबका साथ, सबका विश्वास बोलण्यापुरतं नव्हे तर कृतीतून मांडले आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणला नवी दिशा मिळाली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते, चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री होते. नागपूरच्या विकासासाठी या दोन्ही नेत्यांनी खूप मोठं योगदान दिले. काही प्रकल्प आणले. एम्स, सिम्बॉसिससारखी इन्स्टिट्यूट नागपूरात आली. आज त्याठिकाणी १० हजार विद्यार्थी शिकत आहेत. भारतात नसेल इतकी सुंदर लायब्ररी नागपूरात महापालिकेने तयार केली. नागपूर शहरात जगातील सर्वात मोठं फाऊंटन होणार आहे. २४ तास जनतेला पाणी मिळवून दिले. अनेक प्रकारचे प्रकल्प, रोजगार आणि सांस्कृतिक विकासासारखे कार्यक्रम भाजपाने यशस्वी केले. नागपूरचा चौफेर विकास भाजपाने केला असं नितीन गडकरींनी सांगितले.

तसेच गोव्यात देवेंद्र फडणवीसांसोबत नागपुरातील, राज्यातील अनेक भाजपा नेते, कार्यकर्ते प्रचारासाठी फिरत होते, मेहनत घेतली. त्या सर्वांच्या परिश्रमाचं हे फळ आहे. तसेच आता मागच्यावेळी नागपूर महापालिकेत जे यश मिळालं होतं त्यापेक्षा मोठं यश येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपल्याला मिळेल हा संकल्प प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांनी करावं. होळीच्या पवित्र दिवशी विजयाचा यशस्वी संकल्प करू असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले.

Web Title: Nitin Gadkari: One Day BJP in Power in Maharashtra; Union Minister Nitin Gadkari's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.