Corona Virus in Nagpur; नितीन गडकरींनी घेतला महाराष्ट्रातील ‘कोरोना’ स्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 05:56 PM2020-03-26T17:56:16+5:302020-03-26T17:57:18+5:30

‘कोरोना’संदर्भात राज्यभरात केंद्र सरकारच्या सूचनांचे कशा पद्धतीने पालन होत आहे याचा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीगुरुवारी आढावा घेतला.

Nitin Gadkari reviews 'Corona' status in Maharashtra | Corona Virus in Nagpur; नितीन गडकरींनी घेतला महाराष्ट्रातील ‘कोरोना’ स्थितीचा आढावा

Corona Virus in Nagpur; नितीन गडकरींनी घेतला महाराष्ट्रातील ‘कोरोना’ स्थितीचा आढावा

Next
ठळक मुद्देराज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी केला संपर्क ‘कोरोना’च्या बाबतीतील सूचनांच्या अंमलबजावणीबाबत केली विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’संदर्भात राज्यभरात केंद्र सरकारच्या सूचनांचे कशा पद्धतीने पालन होत आहे याचा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीगुरुवारी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार गडकरी यांनी नागपुरातून विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत विचारणा केली. त्याचप्रमाणे मदतीची आवश्यकता भासली तर थेट संपर्क करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.
गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरू0न संपर्क साधला. राज्यात ‘कोरोना’संदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन होत आहे की नाही तसेच केंद्र शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे का याची जिल्हाधिकाºयांना विचारणा करण्यास सांगितले. यानंतर गडकरी यांनी तातडीने विविध जिल्हाधिकाºयांशी स्वत: संपर्क साधला व त्यांच्याकडून नेमकी स्थिती जाणून घेतली. यात अहमदनगर, अकोला, जळगाव, बीड, धुळे, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई इत्यादी जिल्हाधिकाºयांचा समावेश होता. केंद्रीय गृह विभाग आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीची स्थिती त्यांनी जाणून छेतली. सोबतच तेथील कायदा व सुव्यवस्था, अन्न पुरवठा, वाहतूक इत्यादीबाबतदेखील गडकरी यांनी विचारणा केली. मुंबई व पुणे वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील स्थिती नियंत्रणात असल्याचे संबंधित जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

मदत लागल्यास थेट संपर्क करा

विविध जिल्ह्यांमध्ये काही अडचणी आहेत का, हे गडकरी यांनी जिल्हाधिकाºयांकडून जाणून घेतले. केंद्र शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असेल तर तसे थेट सांगा. मदत लागली तर मला संपर्क करा, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्र सरकार या कठीण परिस्थितीत जनतेची सेवा करणाºया सर्व अधिकाºयांच्या पाठीशी उभे आहे, असेदेखील गडकरी यांनी सांगितले.

 

Web Title: Nitin Gadkari reviews 'Corona' status in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.